मनविसे निवेदनानंतर पंढरपूर तालुक्यातील चीनी फलक व चीनी वस्तू बंद सागर बडवे
(प्रतिनिधी)पंढरपूर
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आदित्य शिरोडकर साहेब यांच्या आदेशानुसार व पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अॅड.सचिन पवार साहेब ,सोलापूर संपर्क अध्यक्ष विजय रोकडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली….
२२/०६/२०२०रोजी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने प्रांताधिकारी साहेब व मोबाईल असोसिएशन चे अध्यक्ष व सर्व दुकानदार यांना निवेदन देण्यात आले होते की पंढरपूर तालुक्यातील सर्व चीनी वस्तू व चीनी फलक येत्या पाच दिवसात सर्व विक्री व फलक काढण्यात यावे ही मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने केली होती.त्या मागणीनुसार पंढरपूर व्यापारी कमिटी व मोबाईल असोसिएशन यांनी त्या मागणीला पाठींबा दिला व २६/०६/२०२० रोजी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना व मोबाईल असोसिएशन यांच्या मध्ये मिटींग पार पडली व त्या मिटींगमध्ये जी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने मागणी केली होती चीनी वस्तू व चीनी फलक त्या मिटींगमध्ये मोबाईल असोसिएशन ने हिरवा कंदील दाखवण्यात आला.व त्या मिटींगमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे सोलापूर जिल्हा संघटक सागर बडवे यांनी घोषणा केली कि मोबाईल असोसिएशन ने चीनी वस्तू व चीनी फलक काढले कि सर्व मोबाईल दुकानदाराचे सत्कार करण्यात येईल असे सांगितले होते . त्यानुसार आज २९/०६/२०२०रोजी मोबाईल असोसिएशन चे अध्यक्ष व सर्व दुकानदारांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी मनविसे सोलापूर जिल्हा संघटक सागर बडवे, पंढरपूर शहराध्यक्ष प्रताप भोसले व पंढरपूर उपाध्यक्ष अवधुत गडकरी व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थीनी सेना शहराध्यक्ष पुजा माळी आणि शहरउपाध्यक्ष ईशा गायकवाड उपस्थित होते..
