
अकलूज ग्रामपंचायत च्या विरोधातील बहुजन ब्रिगेडच्या मागणीला यश–उदय कांबळे
प्रतिनिधी–अकलूज
बहुजन ब्रिगेड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किरण साठे यांच्या आदेशानुसार व मार्गदर्शनाखाली माळशिरस तालुक्यातील अकलूज ग्रामपंचायत च्या हद्दीतील गणेश नगर ते सदुभाऊ चौक हा रस्ता दुरुस्त करावा अन्यथा त्या रस्त्याला अकलूज जिल्हा परिषदेचे सदस्य,पंचायत समिती सदस्य व सरपंच यांचे नाव देऊन आंदोलन करणार असल्याचा इशारा१९ मार्च २०२० रोजी बहुजन युवा ब्रिगेडचे अकलूज शहराध्यक्ष उदय कांबळे व धवल कांबळे यांनी अकलूज ग्रामपंचायतला दिला होता त्यासंदर्भात अकलूज ग्रामपंचायतला निवेदन देण्यात आले होते.निवेदन ओ एस बाळासाहेब वाईकर यांनी स्वीकारले होते.

या आंदोलनाच्या इशारा दिल्याने अकलूज ग्रामपंचायत ने गणेश नगर ते सदुभाऊ चौक ह्या रस्त्याचे काम केले असल्याने बहुजन ब्रिगेड संघटनेचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे,गणेशनगर ते सदुभाऊ चौक या रस्त्याचे काम करण्यात आल्याने बहुजन ब्रिगेड संघटनेच्या मागणीला यश मिळाले असल्याचे बहुजन युवा ब्रिगेडचे अकलूज शहराध्यक्ष उदय कांबळे यांनी सांगितले.
