
माळशिरस येथील कारागृह चालू करण्याची गृहमंत्री यांच्याकडे किरण साठे यांची मागणी
प्रतिनिधी–माळशिरस
माळशिरस तालुक्यातील मॅजेस्टिक कस्टडी रिमांड मध्ये आरोपींना ठेवण्यासाठी माळशिरस येथील कारागृह त्वरित चालू करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री श्री अनिल देशमुख यांच्याकडे ईमेलच्या माध्यमातून निवेदन पाठवून केली आहे

माळशिरस तालुक्यातील अकलूज,माळशिरस,नातेपुते, वेळापूर या ठिकाणी पोलीस स्टेशन आहेत.यांच्या कार्यक्षेत्रात गुन्हे घडल्यानंतर संबंधित आरोपींना कोर्टात हजर केले असता त्यांना पोलीस कस्टडी रिमांड मिळाल्यानंतर त्यांना या संबंधित पोलीस स्टेशनमध्ये ठेवले जात आहे,मात्र यांची पोलीस कस्टडी रिमांड संपल्यानंतर त्यांना मॅजेस्टिक कस्टडी रिमांड मिळाल्यानंतर त्यांना तालुक्याच्या ठिकाणी कारागृहात ठेवण्यासाठी कारागृह उपलब्ध नाही असे निवेदनात म्हटले आहे.

माळशिरस तालुक्यातील अकलूज,माळशिरस,नातेपुते, वेळापूर या पोलीस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचारी यांना संबंधित गुन्ह्यातील आरोपींना सोलापूर,कळंबा कोल्हापूर या कारागृहात हलवावे लागत असून याचा ताण पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यावर पडत आहे, तरी आपण कारागृह चालू करण्यासाठी व नवीन बांधन्याच्या दुरुष्टीने प्रयत्न करावा किंवा माळशिरस मध्ये तहसील कार्यालय येथे असलेले कारागृह आरोपींना ठेवण्यासाठी ज्या उपाययोजना करणे आवश्यक आहे,त्या उपाययोजना करून चालू करण्याच्या सूचना संबंधित खात्याला त्वरित देऊन आरोपींना माळशिरस तालुक्यामध्ये ठेवण्यासाठी प्रयत्न करावे व पोलीस प्रशासनाला होणार त्रास कमी करावा असे राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी निवेदनात नमूद केले आहे,सदर निवेदनाच्या प्रति माहितीसाठी व पुढील कार्यवाही करण्यासाठी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री,सोलापूर जिल्हयाचे जिल्हाधिकारी,सोलापूर जिल्ह्याचे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांना पाठवण्यात आल्या आहेत.