
उपवनसंरक्षक यांच्या कारवाई करण्याची मागणी
मंत्रालयासमोर मविसेच्या आंदोलनाचा दुसरा दिवस
प्रतिनिधी : कोल्हापूर,सांगली,सातारा जिल्ह्यातील उपवनसंरक्षक यांच्या कार्यालयातील विविध कामाची,अतिक्रमण,अधिकारी यांच्या बाबतीत असलेल्या तक्रारीची चौकशी करून कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी कोल्हापूर येथील मुख्य वनसंरक्षक यांच्या कार्यालयासमोर ३ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेश खरे व सरचिटणीस अविराज माने यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण करण्यात आले होते.
आमरण उपोषणाची दखल घेवून कोल्हापूर प्रादेशिक विभागाचे मुख्य वनसंरक्षक आर एम रामानुजम यांनी सांगली सातारा कोल्हापूर यांना राजेश खरे अविराज माने यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने सखोल चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत मात्र कोणत्याही उपवनसंरक्षक यांनी चौकशी केली नाही आणि तिन्ही जिल्ह्यातील आर एफ ओ यांना पाठिशी घालण्याचे काम केले असून तिन्ही उपवनसंरक्षक यांच्या कारवाई करण्याच्या मागणीसाठी मविसेच्या वतीने मुंबई येथील मंत्रालयासमोर आझाद मैदान येथे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे,त्याचा आजचा दुसरा दिवस आहे,कारवाई होईपर्यंत उठणार नसल्याचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेश खरे यांनी सांगितले.