मंत्रालय ते अकलूज पर्यंत मविसेचे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू
जुने एसटी स्टँड ते नवीन एसटी स्टँड दरम्यान अतिक्रमण करणाऱ्याला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यावरती कारवाई करण्याची मागणी
प्रतिनिधी : : अकलूज मधील जुने एसटी स्टँड ते नवीन एसटी स्टँड दरम्यान असलेल्या रस्त्याच्या मध्यभागापासून डाव्या बाजूला २० मीटर आणि उजव्या बाजूला २० मीटर अंतरामध्ये अतिक्रमण केलेल्या लोकांचे अतिक्रमण काढण्यात यावे या मागणीसाठी अकलूज येथील साहित्यरत्न डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासमोर महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे प्रदेश सचिव अनिल साठे यांच्या नेतृत्वाखाली ४ फेब्रुवारीपासून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे. यावेळी राज्य संपर्क प्रमुख बाळासाहेब कांबळे,युवा सेना जिल्हा संघटक साईराज अडगळे,तालुका अध्यक्ष आदित्य काकडे,बापूसाहेब वाघमारे,उपस्थित होते.रस्त्याच्या दोन्ही बाजूला अतिक्रमण करणारे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांना माहीत असताना सुद्धा ते अतिक्रमण करनाऱ्यावरती व अतिक्रमण धारकांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यावरती कारवाई करण्यात यावी आणि अतिक्रमण तात्काळ हटविण्यात यावे या मागणीसाठी अकलूज येथील डॉ.आण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासमोर गेले सात दिवस झाले बेमुदत ठिय्या व थाळीनाद आंदोलन सुरू आहे.याच मागणीसाठी मुंबईतील मंत्रालयासमोर आझाद मैदान येथे महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे.आंदोलनाला महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेश खरे हनुमंत भुसनर,पप्पू गायकवाड, संदीप धुमाळ उपस्थित आहेत.