आमदार बबन दादा शिंदे व संजयमामा शिंदे यांचा किरण साठे यांनी केला सत्कार
प्रतिनिधी— टेभुर्णी—राष्ट्रवादी काँग्रेसचे माढा-माळशिरस विधानसभेचे नूतन आमदार बबन दादा शिंदे व राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत करमाळा विधानसभेचे नूतन आमदार म्हणून निवडून आलेले संजयमामा शिंदे यांचा अकलूज शहर व माळशिरस तालुक्याच्या वतीने बहुजन ब्रिगेडचे अध्यक्ष किरण साठे यांनी त्यांच्या निमगाव तालुका माढा येथील निवास्थानी जाऊन सत्कार केला,किरण साठे यांनी संजयमामा शिंदे हे लोकसभेला निवडणुकीला उभे असताना त्यांना पाठिंबा देऊन सक्रियपणे प्रचारात आघाडी घेऊन काम केले होते,यावेळी संजयमामा शिंदे यांनी किरण साठे यांची काळजीपूर्वक विचारपूस केली, यावेळी समता परिषद अध्यक्ष पिंटू एकतपुरे,बहुजन ब्रिगेडचे माढा तालुका अध्यक्ष गौतम कांबळे, लखन कांबळे,सागर कोळी,इत्यादी उपस्थित होते