बहुजन ब्रिगेडच्या माळशिरस तालुका सचिवपदी शिवम कांबळे यांची निवड
नातेपुते–प्रतिनिधी —-
बहुजन ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष किरण साठे यांच्या उपस्थितीत व बहुजन ब्रिगेडचे प्रमुख संघटक दत्ता कर्चे यांच्या सूचनेनुसार बहुजन ब्रिगेड संघटनेच्या माळशिरस तालुका सचिव पदी निमगाव (मगराचे) येथील शिवम कांबळे यांची अकलूज येथे झालेल्या संघटनेच्या बैठकीत निवड करण्यात आली.संघटनेचे अध्यक्ष किरण साठे यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले.यावेळी बहुजन ब्रिगेडचे महाराष्ट्र राज्याचे नेते शंकर वाघमारे,माळशिरस तालुका अध्यक्ष धनाजी पाटील,शंकर वाघमारे,महिला आघाडी तालुका अध्यक्ष रुक्मिणी रणदिवे,अभिजित रणदिवे,आनंद मिसाळ,रफिक मुलाणी,उदय कांबळे,राहुल लिंगे,विकास तोरणे,नितीन तोरणे,राजेंद्र तोरणे,बापूसाहेब करडे,उमेश तोरणे,बाबासाहेब तोरणे,आप्पासाहेब होनमाने इत्यादी उपस्थित होते.यावेळी असंख्य कार्यकर्ते संघटनेत सहभागी झाले.
बहुजन समाजामध्ये एकोपा निर्माण करून बहुजन समाजातील प्रत्येक घटकापर्यंत संघटनेची ध्येय धोरणे पोहचविण्यासाठी प्रयत्न करून समाजातील महिला,विद्यार्थी,
सुशिक्षित बेरोजगार,शेतकरी यांच्या प्रश्नांला वाचा फोडण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करून त्याला प्रसिद्धी द्यावी असे नियुक्ती पत्रामध्ये नमूद केले आहे.
