उपसरपंच मल्हारी लोखंडे यांचा बहुजन ब्रिगेडच्या वतीने सत्कार
प्रतिनिधी—अकलूज—बहुजन ब्रिगेड संघटनेचे पुणे जिल्ह्यातील पहिले उपसरपंच होण्याचा मान मल्हारी लोखंडे यांनी मिळविला आहे.त्याबद्दल अकलूज मध्ये बहुजन ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी त्यांचा सत्कार केला.यावेळी बहुजन ब्रिगेडचे शंकर शिंदे,मनसे अकलूज शहराध्यक्ष सुदाम आवारे,बहुजन ब्रिगेडचे अकलूज शहर उपाध्यक्ष बंडू कांबळे उपस्थित होते.
मौजे भोंडणी तालुका इंदापूर येथील ग्रामपंचायतच्या निवडणुकीत बहुजन ब्रिगेड संघटनेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष मल्हारी लोखंडे हे निवडून आले आहेत.मल्हारी लोखंडे यांनी बहुजन ब्रिगेडमध्ये काम करीत असताना बहुजन समाजामध्ये एकोपा करण्यासाठी प्रयत्न करून सर्व समाजातील प्रत्येक घटकाला एकमेकांच्या हातात हात घेऊन वागावे यासाठी प्रयत्न केले होते आणि सर्व समाज गुण्यागोविंदाने नांदण्यासाठी अवरीत पणे काम केले आणि आपली वेगळी ओळख निर्माण केल्याने त्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत यश मिळवले आहे.मल्हारी लोखंडे हे मौजे भोंडणी गावच्या उपसरपंच पदी विराजमान झाले आहेत,त्यांचा सन्मान बहुजन ब्रिगेडचे संघटनेच्या वतीने करण्यात आला आणि अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी लोखंडे यांना भावी कार्यास शुभेच्छा दिल्या.
