बहुजन ब्रिगेडचा २४ मे ला नातेपुते येथे वर्धापनदिनानिमित्त कार्यक्रम
विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार वितरण,साडी वाटप,कार्यकर्ता मेळावा
प्रतिनिधी : नातेपुते : बहुजन ब्रिगेड संघटनेच्या पाचव्या वर्धापनदिन दिनानिमित्त नातेपुते येथे २४ मे ला सायंकाळी ५.३० वाजता साहित्यरत्न डॉ आण्णाभाऊ साठे चौक येथे पुरस्कार वितरण,साडी वाटप,आणि कार्यकर्ता मेळावा बहुजन ब्रिगेड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किरण साठे,प्रदेशाध्यक्ष दत्ता कर्चे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे.
सदर कार्यक्रमाला अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे नूतन संचालक आणि उपसभापती मामासाहेब पांढरे,उपनगराध्यक्ष मालोजीराजे देशमुख,माजी पंचायत समिती सदस्य गौतम माने, माजी उपसभापती किशोर सुळ, माजी पंचायत समिती सदस्य माऊली पाटील,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष, धैर्यशील देशमुख,धैर्यशील पाटील, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष माणिक वाघमोडे,काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष सतीश पालकर,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सचिव अक्षय भांड,काँग्रेस पक्षाचे अनुसूचित जाती विभागाचे तालुका अध्यक्ष रघुनाथ साठे,शिवसेना ठाकरे गटाचे उपतालुका प्रमुख अमोल उराडे,माळशिरस नगरपंचायत चे नगरसेवक कैलास वामन,नातेपुते नगरपंचायतचे नगरसेवक नंदू लांडगे,नगरसेवक आण्णासाहेब पांढरे,नातेपुते ग्रामपंचायत चे माजी सदस्य संदीप ठोंबरे हे प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत.अशी माहिती बहुजन ब्रिगेड संघटनेचे माळशिरस तालुका अध्यक्ष धनाजी जाधव पाटील यांनी दिली आहे.सदर कार्यक्रमाला माळशिरस तालुक्यातील संघटनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना तसेच नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन धनाजी जाधव पाटील यांनी केले आहे. तसेच
बहुजन ब्रिगेड संघटनेच्या माध्यमातून वर्धापनदिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रातील त्यांच्या कामाची दखल घेऊन संघटनेच्या माध्यमातून मान्यवरांना पुरस्कार प्रदान केले जातात याममध्ये अकलूजमधील अँड.अविनाश काले यांना साहित्यरत्न डॉ आण्णाभाऊ साठे,महेश शिंदे यांना सामाजिक कार्यकर्ता,ऋतुजा सदाफुले यांना
उत्कृष्ट डान्सर,नातेपुते येथील अतुलशेठ बावकर यांना
यशस्वी उद्योजक,तेजस पाटील यांना अन्नदाता,प्रेम देवकाते यांना सामाजिक कार्यकर्ता,फोंडशीरस येथील वाल्मिक रणदिवे यांना सामाजिक कार्यकर्ता,मांडकी येथील अभिजीत केंगार सामाजिक कार्यकर्ता,वेळापूर येथील अजित साठे यांना समाज भूषण,विझोरी येथील अजित बोरकर यांना शेतकरी योद्धा हे पुरस्कार संघटनेच्या वतीने जाहीर करण्यात आले आहेत.संघटनेच्या पाचव्या वर्धापनदिनाचा कार्यक्रम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किरण साठे,प्रदेशाध्यक्ष दत्ता कर्चे यांच्या प्रमुख अध्यक्षतेखाली व नातेपुते येथील प्रतिष्ठित व लोकप्रतिनिधी यांच्या प्रमुख उपस्थितीत नातेपुते येथील साहित्यरत्न डॉ.आण्णाभाऊ साठे चौक येथे सायंकाळी ५.३० वाजता संपन्न होणार असल्याचे तालुका अध्यक्ष धनाजी जाधव पाटील यांनी सांगितले.
