कर्नाटकच्या विजयामध्ये डॉ.धवलसिंह मोहिते पाटील यांचेही योगदान – किरण साठे
प्रतिनिधी :अकलूज :भारतीय जनता पक्षाची कर्नाटक राज्यात असलेली सत्ता काँग्रेस पक्षाने उलथवून टाकून सत्ता परिवर्तन झाल्याने डॉ धवलसिंह मोहिते पाटील यांचा बहुजन ब्रिगेड संघटनेचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी मनाचा फेटा बांधून पेढा भरवून सत्कार करून अभिनंदन केले.यावेळी काँग्रेस पक्षाचे अनुसूचित जाती विभागाचे तालुका अध्यक्ष रघुनाथ साठे,बहुजन ब्रिगेडचे अकलूज शहराध्यक्ष आनंद मिसाळ उपस्थित होते.
काँग्रेस पक्षाचे सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष डॉ.धवलसिंह मोहिते पाटील यांनी कर्नाटक राज्यामध्ये झालेल्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये सहभाग घेतला होता त्यांनी कर्नाटक राज्यातील धारवाड,इंडी,आळंद या विधानसभा मतदारसंघांमध्ये जाऊन काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार केला होता.कर्नाटक राज्यामध्ये झालेल्या सत्ता परिवर्तना मध्ये सोलापूर जिल्ह्यातून जिल्हाध्यक्ष डॉ धवलसिंह मोहिते पाटील यांनी प्रचारासाठी हजेरी लावून योगदान दिले तसेच त्यांचा पायगुण चांगला असल्याचा प्रत्यय या तिन्ही मतदारसंघातील उमेदवारांच्या विजयाने निश्चित झाला आहे.त्यामुळे कर्नाटक राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता उलथवून टाकण्यामध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने डॉ.धवलसिंह मोहिते पाटील यांचे योगदान असून विजयामध्ये त्यांचा खरीचा वाटा असल्याची प्रतिक्रिया बहुजन ब्रिगेड संघटनेचे अध्यक्ष तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी दिली आहे.
