बहुजन ब्रिगेडचा नातेपुते येथे रेकॉर्डब्रेक कार्यक्रम

बहुजन ब्रिगेडचा नातेपुते येथे रेकॉर्डब्रेक कार्यक्रम

पुरस्कार वितरण,कार्यकर्ता मेळावा संपन्न

प्रतिनिधी : नातेपुते : बहुजन ब्रिगेड संघटनेचा पाचवा वर्धापनदिनाचे औचित्य साधून नातेपुते येथे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किरण साठे आणि प्रदेशाध्यक्ष दत्ता कर्चे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता.सदर कार्यक्रमाला पंचायत समितीचे माजी उपसभापती किशोर सुळ,नगरसेवक नंदू लांडगे,नगरसेवक कैलास वामन,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष धैर्यशील पाटील,काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सतीश पालकर,अनुसूचित जाती तालुका अध्यक्ष रघुनाथ साठे,भाजपा अनुसूचित जाती अध्यक्ष बाबुराव खिलारे,विठ्ठल ठोंबरे,अजित बाविस्कर,उपस्थित होते.कार्यक्रम रेकॉर्डब्रेक झाला असल्याचे संस्थापक अध्यक्ष किरण साठे यांनी सांगितले.

विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल संघटनेच्या वतीने अँड.काले,अतुल बावकर,महेश शिंदे,तेजस पाटील,अजित साठे,अजित बोरकर,अभिजित केंगार,प्रेम देवकाते,वाल्मिक रणदिवे,ऋतुजा सदाफुले,महेश इटकर यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.कार्यक्रमाला संघटनेच्या पदाधिकारी यांच्यासह तालुक्यातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

संघटनेचे अध्यक्ष किरण साठे, अँड.काले,अजित साठे,शंकर वाघमारे,यांनी भाषण केले तर प्रदेशाध्यक्ष दत्ता कर्चे यांनी संघटनेच्या कामाचा लेखा जोखा मांडला.सूत्रसंचालन अनिल साठे आणि आभार प्रदर्शन सचिन खिलारे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom