पंढरपूर मधील एसटी स्टॅन्ड मध्ये संत रोहिदास महाराजांची प्रतिमा बसविण्याची मागणी अखेर झाली पूर्ण…
बहुजन ब्रिगेड संघटनेच्या आंदोलनाचा मिळाले यश….
प्रतिनिधी : पंढरपूर : महाराष्ट्र राज्यातील भाविक नेहमीच पंढरपूरला येत असतात आणि त्यांचा प्रवास एसटी मधूनच होत असतो म्हणून सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मोठ्या एसटी स्टँड मध्ये चर्मकार सामाजाचे प्रेरणास्थान असलेले संत रोहिदास यांची प्रतिमा लावण्यात यावी अशी मागणी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किरण साठे यांच्या मार्गदर्शनाखाली बहुजन ब्रिगेड संघटनेचे पंढरपूर शहराध्यक्ष अमोल घोडके यांनी पंढरपूर एसटी आगार प्रमुख यांना निवेदन देवून केली होती.
शिरोमणी संत रोहिदास यांच्या प्रतिमेच्या मागणीवर बहुजन ब्रिगेड संघटनेने आक्रमक भूमिका घेतली होती.पंढरपूर एस टी स्टँड मध्ये आगार प्रमुख डी एम सुतार यांना प्रतिमा भेट दिल्यानंतर त्यांनी स्वतःच्या कार्यालयात संत रोहिदास यांची प्रतिमा लावली आहे.त्यामुळे बहुजन ब्रिगेड संघटनेच्या पाठपुराव्याला आणि आंदोलनाला यश मिळाले असल्याचे बहुजन ब्रिगेडचे पंढरपूर शहराध्यक्ष अमोल घोडके यांनी सांगितले.यावेळी चर्मोद्योग सेना,जिल्हाध्यक्ष राहुल गवळी, पुळूज चे उमेश होनकळस,युवा नेते,बंडू कुंभार,ओम देवमारे, उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्यात पंढरपूर हे नामांकित आराध्य दैवत असून पंढरपूर हे संतांचे माहेर घर म्हणून संपूर्ण देशात ओळखले जाते,पंढरपूर शहरामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून व देशातून भाविक येत असतात त्यांना शिरोमणी संत रोहिदास यांचे कार्य माहीत व्हावे तसेच त्यांच्या कार्याचा सर्वत्र प्रचार व्हावा आणि त्यांचे काम फक्त चर्मकार समाजपुरते मर्यादित नाही हे समजण्यासाठी पंढरपूर येथील एसटी स्टँड मध्ये त्यांचे तैलचित्र(प्रतिमा) लावण्यात यावे अशी मागणी केली होती.पंढरपूर येथील एसटी स्टँडच्या आगार प्रमुख यांच्या कार्यालयात संत रोहिदास यांची प्रतिमा लावल्यामुळे बहुजन ब्रिगेड संघटनेचे कौतुक केले जात असून चर्मकार समाजामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

