फुरसुंगी येथे सरदार नरवीर तान्हाजी मालुसरे यांना विनम्र अभिवादन

फुरसुंगी येथे सरदार नरवीर तान्हाजी मालुसरे यांना विनम्र अभिवादन

फुरसुंगी प्रतिनिधी-: पावरहाऊस फुरसुंगी येथे मा.संतोष भाऊ हरपळे मित्र मंडळ, स्वयंभू प्रतिष्ठान,आधार बहुउद्येशीय संस्था यांच्या वतीने सरदार नरवीर तान्हाजी मालुसरे यांचा स्मृतिदिन अभिवादन करून युवा नेते उद्योजक भावी नगरसेवक मा. श्री. संतोष भाऊ हरपळे यांच्या हस्ते प्रतीमेची पुजन करून साजरी करण्यात आली.
आजच्याच दिवशी म्हणजेच 4 फेब्रुवारी 1670 रोजी कोंडाणा किल्ला सर करतांना नरवीर तानाजी मालुसरे धारातीर्थी पडले. तो दिवस आपण सर्वञ “शौर्य दिन” म्हणून साजरा क रतो. तानाजी मालुसरे हे छञपती शिवाजी महाराजांचे बालपणी पासूनचे सवंगडी होते. डोंगरदऱ्यात खेळणे, घोडदौड करणे, लढाईचा सराव करणे असे खेळ ते खेळत असत. रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापणेची शपथ ज्या सवंगडया सोबत महाराजांनी घेतली त्यात तानाजी हे अग्रेसर होते. शिवाजी महाराजांचा उजवा हात म्हणून तानाजी यांची ख्याती होती. इतिहासात फक्त कोंडाण्याची मोहिम म्हटले की तानाजी एवढाच ञोटक इतिहास दाखविलेला आहे,पण या अगोदर ही भरपूर अशा फत्ते मोहिमा तानाजी मालुसरे या “कोळी महादेव” सरदाराने पुर्ण केलेल्या आहेत. महाराजावर असलेल्या असिम अशा निष्टेमुळेच स्वत:चा मुलगा रायबा याचे लग्न बाजुला सारून “आधी लग्न कोंडाण्याचे मग माझ्या रायबाचे…!” असे म्हणत कोंडाण्यावर स्वारी करून अतुलनीय कामगिरी केली असे विचार
मा.संतोष भाऊ हरपळे यांनी व्यक्त केले .
या वेळी महेंद्रशेठ हरपळे,अजयशेठ हरपळे,आकाशशेठ हरपळे,गणेशशेठ हरपळे, महादेव कोळी समाजाचे नेते अनिल शेठ मरकंटे ,बहुजन ब्रिगेड संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ आगलावे,अक्षय झांबरे, ,बबलू भिसे,
राजू क्षीरसागर,बंटी भिसे,भैय्या शिंदे, सचिन दाभाडे,सचिन जाधव,शंकर पाटील, ऋतूराज माने,तुषार कदम,रोहित जाधव इत्यादी नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom