पंढरपूर ग्रा.पो.स्टेशनचे प्रभारी अधिकारी व कदम हवालदार यांच्यावर कारवाई करण्याची पोलीस अधीक्षक यांच्याकडे बहुजन ब्रिगेडची मागणी
प्रतिनिधी—सोलापूर–पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी व कदम हवालदार यांच्यावर कारवाई करून राधा मारुती गेंड यांच्या नातेवाईक यांच्या खिश्यातून पैसे काडून घेणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलीस अधीक्षक सोलापूर यांच्याकडे बहुजन ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राजेश खरे यांनी केली आहे.
मौजे कौठाळी ता पंढरपूर येथील राधा मारुती गेंड यांना माहेराला नेण्यासाठी आलेल्या लोकांना मारहाण करून त्यांच्या खिश्यातील 20 हजार रुपये कदम पोलीस यांच्यासमोर काढून घेणाऱ्या आप्पा शिवाजी गोडसे,दत्तात्रय सुखदेव पाटील यांच्यावरही दरोड्याचा गुन्हा दाखल करावा तसेच तसेच राधा गेंड यांच्या नातेवाईक यांना सोडवण्यासाठी आलेल्या जामीनदार यांच्याकडून 11500 रुपये कलम कमी करतो म्हणून व गाडी सोडवण्यासाठी रिपोर्ट व्यवस्थित करतो म्हणून 2 हजार रुपये श्री कदमसाहेब यांनी घेतले आहेत,तसेच राधा मारुती गेंड ह्या आपली फिर्याद देण्यासाठी पंढरपूर पोलीस स्टेशनमध्ये गेल्या असता त्यांची फिर्याद न घेणाऱ्या प्रभारी अधिकारी व त्यांना लज्या उत्पन्न होईल अशी शिवीगाळ करणाऱ्या कदम पोलीस यांच्यावर 354 प्रमाणे गुन्हा दाखल करून संबंधित दोन्ही प्रकरणामध्ये प्रभारी अधिकारी व कदम पोलीस यांना आरोपी करून गुन्हा नोंद करण्यासाठी आपल्या स्तरावरून तात्काळ आदेश देण्यात यावे अन्यथा पोलीस अधीक्षक सोलापूर यांच्या कार्यालयासमोर दिनांक 9/11/2020 रोजीपासून जिल्हाधिकारी साहेब यांच्या जमावबंदी आदेशाचे पालन करून शासकीय वेळेत बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा बहुजन ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष राजेश खरे यांनी दिला आहे.सदर निवेदनाच्या प्रति गृहमंत्री महाराष्ट्र राज्य व पोलीस महानिरीक्षक यांना पाठविण्यात आल्या आहेत.
