माळशिरस पंचायत समितीच्या बदल्यांची चौकशी करण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

माळशिरस पंचायत समितीच्या बदल्यांची चौकशी करण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

प्रतिनिधी—सोलापूर—माळशिरस गटविकास अधिकारी यांनी केलेल्या समाययोजन व प्रशासकीय बदल्याची चौकशी करण्याची मागणी श्री प्रकाश वायचळ मुख्यकार्यकारी अधिकारी सोलापूर जिल्हा परिषद यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

माळशिरस पंचायत समिती मध्ये अनेक ग्रामसेवक यांच्याकडे दोन ते तीन गावाचा चार्ज असल्याने ज्यांच्याकडे एक पेक्षा जास्त गावाचा पदभार आहे,अशा ग्रामसेवक यांना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागत असून एक पेक्षा जास्त गावाचा पदभार असल्याने त्यांना त्यांची अधिकृत रित्या ज्या ठिकाणी नेमणूक आहे,त्या गावातील लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी अडचणी निर्माण होत असल्याचे अनेक ठिकाणी पहावयास मिळाले असून माळशिरस पंचायत समिती मध्ये काही ग्रामसेवक पंचायत समिती कार्यालयात मागील अनेक महिन्यापासून काम करीत असल्याचे आम्हाला समजले आहे,तरी त्या ग्रामसेवक यांची इतर गावामध्ये का?नेमणूक करीत नाहीत असा प्रश्न निर्माण झाला आहे त्यांना तालुक्यातील इतर गावाचा पदभार दिल्यास ज्या ग्रामसेवक यांच्याकडे जास्त गावाचा पदभार आहे,त्यापैकी काही गावाचा पदभार का देण्यात येत नाही?हे न उलघडणारे कोडं आहे,जर आशा जास्तीचा पदभार असलेल्या गावचा चार्ज पंचायत समिती मध्ये नेमणूक असलेल्या ग्रामसेवक यांना दिल्यास संबंधित जास्त पदभार असलेल्या ग्रामसेवकाचा जास्तीचा ताण कमी होऊन त्याच्याकडे असलेल्या अधिकृत नेमणूक केलेल्या गावाला न्याय देता येईल,मात्र तसेच या गटविकास अधिकारी करताना दिसत नाहीत,संबंधित माळशिरस पंचायत समितीमध्ये नेमणूक केलेल्या प्रत्येक ग्रामसेवक यांना समुपदेशन करून एका गावाचा पदभार देऊन तात्काळ अधिकृत नेमणूक करण्यासंदर्भात आपल्या स्तरावरून आदेश व्हावेत व अद्यापपर्यंत या ग्रामसेवकाना कोणत्याच गावाचा पदभार का देण्यात आला नाही?व कोणत्या कारणाने त्यांना पदभार दिला नाही याचा लेखी खुलासा माळशिरस पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांच्याकडून घ्यावा असे साठे यांनी निवेदनात म्हटले आहे.

तसेच माळशिरस पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांनी पदभार स्वीकारल्यापासून ग्रामसेवक,ग्रामविकास अधिकारी यांच्या केलेल्या प्रशासकीय बदल्यांची समायोजन व बदल्यांची तसेच सजे निर्मितीची चौकशी करावी आणि ज्या ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांच्या प्रशासकीय बदल्या झाल्या आहेत त्यांनी त्यांच्याकडे पूर्वी असलेल्या गावाचा अतिरिक्त पदभार सोडलेला नाही त्याची चौकशी करून आपल्या जिल्हा परिषद प्रतिनिधी च्या मार्फत इन कॅमेरा झालेल्या बदली प्रक्रियाची अंमलबजावणी न करता व प्रशासकीय बदल्यांचा उद्देश सफल न करता केलेल्या बदल्यांची चौकशी करण्यात यावी,व यामध्ये गटविकास अधिकारी यांनी शासकीय नियमाचे उल्लंगण केले असल्यास त्यांना तात्काळ निलंबित करून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी तसेच पंचायत समिती मध्ये नेमणूक असलेल्या ग्रामसेवकाना तात्काळ पदभार देऊन प्रशासकीय बदल्यांची चौकशी न केल्यास मुख्यकार्यकारी अधिकारी सोलापूर यांच्या कार्यालयासमोर दिनांक 9 नोव्हेंबर 2020 रोजी ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी दिला आहे.सदर निवेदनाची प्रत विभागीय आयुक्त पुणे यांना पाठविण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom