नगरसेवक मारुती देशमुख यांच्या वतीने माळशिरस येथे प्रभाग क्रमांक 11 मधील नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिर

नगरसेवक मारुती देशमुख यांच्या वतीने माळशिरस येथे प्रभाग क्रमांक 11 मधील नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिर

माळशिरस शहरातील नागरीकांसाठी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून माळशिरस नगरपंचायत व डाॅक्टर्स व मेडिकल असोशिएशन्स यांच्या सहकार्याने नगरसेवक मारुती देशमुख यांचे वतीने प्रभाग क्र.11मधील नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केलं होतं. या शिबीराचं उद्घाटन जेष्ठ नागरिक महादेव थोरात, अमीर पठाण, स्वाभिमान महीला बचतगटाच्या रोखपाल अश्विनी शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. सध्या कोरोना या आजाराने जगभरात थैमान घातले असुन भारतातील सर्व राज्यात प्रमुख शहरांसह ग्रामीण भागात ही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. सोलापूर शहर आणि ग्रामीण भागात पोहोचला आहे त्या पार्श्वभूमीवर माळशिरस नगरपंचायत च्या वतीने माळशिरस शहरात खबरदारी चा उपाय म्हणून सर्व नागरिकांची आरोग्य तपासणी मोहीम चालु आहे. सदर मोहिमेत मध्ये माळशिरस शहरामधील डाॅक्टर्स ज्यांचे खासगी दवाखाने आहेत अशा सर्व डाॅक्टर मंडळीनी व सर्व मेडिकल दुकानदार यांच्या मेडिकल असोशिएशन्स यानी सामाजिक बांधिलकी म्हणून मोफत सेवा देण्याचं कबुल करून ते आपल्या परीने हातभार लावत आहेत. शहरातील प्रत्येक प्रभागातील नागरीकांची आरोग्य तपासणी सुरू केली आहे त्याच अनुषंगाने प्रभाग क्र 11 मध्ये नगरसेवक मारुती देशमुख यांचे वतीने नागरीकांसाठी आरोग्य तपासणी शिबिर दि.27 एप्रिल रोजी महीला बचतगट ईमारत मध्ये आयोजित केलं होतं. सदर शिबिरामध्ये सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत एकुण 561 लोकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या शिबीरास तपासणी साठी डाॅ. अरूण बंडगर तसेच मेडिकल असोशिएशन्स चे सुरेश टेळे व डाॅ आबासाहेब सिद यानी योगदान दिले. तसेच नागरिकांची नोंदणी साठी अंगणवाडी सेविका लता कुलकर्णी मदतनीस सायरा शेख, आशा सेविका संध्यादेवी कायस्थ तसेच नगरपंचायत च्या वतीने बांधकाम विभागाचे विशाल सावंत यांनी विशेष परीश्रम घेतले. नगरसेवक मारुती देशमुख यांनी आरोग्य शिबिरासंदर्भात प्रभागात घरोघरी जाऊन नागरिकांना मार्गदर्शन करून आरोग्य तपासणी शिबिरास येण्याचं अवाहन केलं होतं त्यांच्या अहवानाला नागरिकांनी उदंड प्रतिसाद देत तपासणी करून घेतली. मुख्याधिकारी श्री विश्वनाथ वडजे व कर निर्धारण अधिकारी श्री विकास पवार यांनी सदर शिबिरास भेट देऊन नागिकांच्या प्रतिसादाबद्दल आनंद व्यक्त करून नगरसेवक मारुती देशमुख यांचं कौतुक केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom