
रेशन दुकानाचा परवाना असलेल्या गावातच धान्य वितरण करावे–किरण साठे
प्रतिनिधी–लवंग–माळशिरस तालुक्यातील बागेचीवडी,खळवे,आनंदनगर, बोडले या रेशनदुकानदाराच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी उपविभागीय अधिकारी माळशिरस विभाग अकलूज यांना निवेदन दिले आहे, यावेळी जनसेवा संघटनेच्या महिलाआघाडीच्या ज्योती कुंभार उपस्थित होत्या.सदर निवेदनावर सागर कोळी,सोमनाथ शेळके,धवल कांबळे यांच्या सह्या आहेत.
माळशिरस तालुक्यातील खळवे गावातील रेशन दुकान हे माळखांबी गावाला तर बागेचीवाडी येथील रेशन दुकान हे आनंदनगर येथील रेशन दुकानाला जोडले असल्याने खळवे गावातील रेशनकार्ड धारकांना माळखांबी येथे तर बागेचीवाडी येथील रेशनकार्ड धारकांना आनंदनगर येथे रेशनचा माल आणण्यासाठी जावे लागत आहे.
आनंदनगर ते बागेची वाडी येथील अंतर कमीत कमी चार ते पाच किलो मिटर असून तसेच माळखांबी ते खळवे हे अंतर कमीतकमी सात तेआठ किलोमीटर आहे.
या अंतरावर असलेल्या रेशन दुकानांमध्ये माल आणण्यासाठी सर्वसामान्य जनतेला पायी चालत जावे लागत आहे.संचारबंदी व लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर आशा सर्वसामान्य जनतेला पेट्रोल,डिझेल देण्याची सोय करण्यात आलेली नाही,त्यामुळे या माळखांबी व आनंदनगर येथील रेशन दुकानदारांच्या मुजोरीमुळे सर्वसामान्य जनतेला आशा त्रासाला सामोरे जावे लागत आहे.ज्या गावचा रेशन दुकानाचा परवाना असतो त्याच ठिकाणी रेशनचे दुकान असणे बंधनकारक असताना हे वरील दुकानदार हे आपल्या मर्जीप्रमाणे माल वितरण करताना दिसत आहेत.त्यामुळे माळखांबी येथील रेशन दुकानदाराने खळवे येथे व आनंदनगर येथील रेशन दुकानदाराने बागेचीवडी येथे माल वितरण वितरण करण्याची व ज्या गावचा परवाना आहे त्याच गावात माल वितरण करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी उपविभागीय अधिकारी माळशिरस विभाग अकलूज यांच्याकडे केली आहे.
याच पद्धतीने आनंदनगर येथील रेशन दुकानदार हा शिक्षक असून तो शासनाच्या दोन्ही योजनेचा लाभ घेत असल्याने व बोडले येथील रेशन दुकानदार हा माल खरेदी करण्यासाठी आलेल्या कार्ड धारकांना आरेरावीची भाषा करत असल्याचेही दिसून आले आहे,व शासकीय नियमानुसार कार्डधारकांना माल देत नसल्याची शक्यता असून त्याची ग्रामस्तरीय समिती मार्फत चौकशी करून दोषी आढळणाऱ्या वरती कारवाई करावी अशीही मागणी श्री साठे यांनी केली आहे.