
कारुंडे येथे थर्मल स्कॅन द्वारे तापमान तपासणी करण्यास सुरुवात
नातेपुते प्रतिनिधी:-सचिन रणदिवे
सोलापूर काही तालुक्यांमध्ये कोरोना चा वाढता संसर्ग असल्यामुळे दक्षता म्हणून कारुंडे येथे बाहेरगावाहून येणारे व आतापर्यंत आलेले सर्व जणांची थर्मल स्कॅन द्वारे तापमान तपासणी करून आरोग्यविषयक काळजी घेण्याची सूचना गावचे सरपंच आणि पोलीस पाटील तसेच सर्व कृती समिती,आरोग्यसेविका, आशासेविका यांच्या माध्यमातून दि :27/04/2020 रोजी पासून सुरू करण्यात आले आहे. ग्रामपंचायतच्या माध्यमातून थर्मल स्कॅन मशीन उपलब्ध करून दिले आणि गावातील इतरही सर्व जे लोक आजारी आहेत अशांचे ही तपासणी याद्वारे होणार आहे, तरी कारुंडे गावातील सर्व नागरिकांना कळविण्यात येते की आपण यावेळी कृती समितीला सहकार्य करून आपल्या घरातील किंवा आपल्या आजूबाजूला जर कोण आजारी असेल सर्दी, खोकला, ताप, घसा दुखणे, दम लागणे इत्यादी लक्षणे असतील तर ताबडतोब कृती समितीस किंवा नजीकच्या सरकारी दवाखान्यामध्ये संपर्क करावा.तसेच गावामध्ये बाहेर जिल्ह्यातून व बाहेरगावाहून जर कोणी आले असेल तर ताबडतोब कृती समितीस माहिती द्यावी ही नम्र विनंती कारुंडे ग्रामपंचायत यांच्या वतीने करण्यात आली तसेच घरी राहा, सुरक्षित राहा असे आव्हान ही करण्यात आले.