दिपावली निमित्त अवधुत गडकरी मित्र परिवाराकडून घोंगडे गल्ली येथे उतणे व पणती वाटप कार्यक्रम…
प्रतिनिधी:पंढरपूर: दीपावली या सणा निमित्त अवधुत गडकरी मित्र परिवार पंढरपूर यांच्या वतीने मोफत सुगंधीत उटणे व पणती वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. घोंगडे गल्ली,नाथ चौक, भादुले चौक येथे सुगंधीत उतणे व पणती वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला, त्यानंतर सर्वांच्या घरोघरी जाऊन दीपावली निमित्त सुगंधीत उटणे व पणती वाटप करून अवधुत गडकरी मित्र परिवाराकडून सर्वाना दीपावली च्या शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी दिनेश जगताप, सोहम कोळी,मंगेश शिंदे,समाधान काळे,दिपेश जगताप, अनिकेत साठे,रोहन पंढरपुरकर व सर्व मित्र परिवार उपस्थित होते. अवधुत गडकरी यांनी दिपावली निमित्ताने आगळावेगळा कार्यक्रम आयोजित केल्याने सामाजिक भान ठेवून कार्यक्रम केल्याने अवधुत गडकरी मित्र परिवार यांचे परिसरात कौतुक केले जाते आहे.

