
पक्षातील पदाधिकारी यांनी इतर पक्षाचे काम केल्यास हकालपट्टी करण्यात येणार – बाळासाहेब कांबळे
प्रतिनिधी : माळशिरस : महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे प्रदेश सचिव अनिल साठे यांच्या आदेशानुसार माळशिरस तालुक्यातील दहिगाव येथील शाखेची संपूर्ण कार्यकारिणी बरखास्त केली असल्याची माहिती महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे प्रदेश संपर्कप्रमुख बाळासाहेब कांबळे यांनी दिली आहे.
महाराष्ट्र विकास सेना पक्षांमध्ये राहून पक्षाच्या ध्येय धोरणाच्या विरोधामध्ये काम केले असल्याने तसेच पक्षाच्या जबाबदार पदावरती असताना इतर पक्षाच्या कामाची प्रसिद्धी करणे तसेच इतर पक्षाचे काम करणे या सर्व गोष्टी लक्षात घ्याता महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या ध्येय धोरणाच्या विरोधामध्ये काम केल्याने या दहिगाव शाखेची संपूर्ण कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. लवकरच दहिगाव येथे नवीन पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार असून शाखा सुरू करण्यात येणार आहे,अशी माहिती प्रदेश संपर्कप्रमुख बाळासाहेब कांबळे यांनी दिली आहे,तसेच पक्षांमध्ये राहून इतर पक्षाचा प्रसार प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्यांची व पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात येणार असल्याची ही माहिती श्री कांबळे यांनी दिली आहे.