पक्षप्रमुख किरण साठे यांची तोफ धडाडणार, कोणते गौप्यस्फोट करणार?,कुणाच्या अंगावर जाणार ?

महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या प्रचाराचा आज विकास नगर येथून शुभारंभ

प्रतिनिधी : अकलूज: महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पक्षप्रमुख किरणसाहेब साठे यांच्या प्रमुख उपस्थितीत अकलूज नगरपरिषद निवडणुक २०२५ चा प्रचाराचा शुभारंभ प्रभाग क्रमांक ७ मधील विकास नगर येथे सायंकाळी ६ वाजता करण्यात येणार आहे… महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सुवर्णा अनिल साठे,प्रभाग क्रमांक ९ मध्ये ज्योती हणमंत सकट, प्रभाग क्रमांक ९ मध्ये अनिल तानाजी साठे,प्रभाग क्रमांक ६ मध्ये किसन उर्फ गिरिराज महादेव माने,प्रभाग क्रमांक ११ मध्ये आशुतोष उर्फ सुजित अनिल साठे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

आठ दिवसांपूर्वी अकलूज मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथे महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने अकलूजमधील पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा मेळावा आयोजित केला होता.त्यामेळाव्यात अकलूजमध्ये दहशत आहे की नाही, याचे पुरावे असल्याचा गौप्यस्फोट करून ते योग्य वेळी बाहेर काढणार असल्याचा इशारा दिला होता,त्या पुराव्याच्या संदर्भात आज प्रचाराचा शुभारंभ प्रसंगी ते बोलणार का, निवडणुकीच्या अनुषंगाने ते गेली आठ दिवस शांतच असल्याने त्यांच्या शांततेवर अनेक जण चर्चा करताना दिसत आहेत. मात्र त्या सर्व चर्चांना आज उत्तर मिळणार का?, ते कुणाच्या अंगावर जातात किंवा कुणाला अंगावर घेतात ? हे आजच्या सभेत कळणार आहे. त्यामुळे त्यांच्या प्रचार शुभारंभ सभेकडे अकलूज करांचे लक्ष लागून राहिले आहे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom