ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरण !

ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरण !

अन्न औषध प्रशासनच्या सोलापूर जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी

महाराष्ट्र विकास सेना पक्ष करणार ६ डिसेंबरला मुंबईत आंदोलन

प्रतिनिधी : मोहोळ : महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पक्षप्रमुख किरण साठे यांनी मंत्रालयात जावून अन्न औषध प्रशासन विभागाचे मंत्री आणि आयुक्त यांना भेटून लाअन्न व औषध प्रशासन विभागाचे मोहोळ तालुका प्रभारी अधिकारी यांना तात्काळ निलंबित करून कायमचे बडतर्फ करण्याची मागणी केली आहे.

संपूर्ण देशासह महाराष्ट्र राज्यात गाजत असलेल्या ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणाच्या चौकशी दरम्यान सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील चिंचोळी एमआयडीसीतील मयूर इंड या कारखान्याच्या परिसारातून कोट्यवधी रुपयांचे एमडी जप्त करण्यात आले आहे.चिंचोळी एमआयडीसीमधील सेंकी केमिकल्स या कारखान्याशेजारी असलेल्या प्लॉट नंबर सी १८० मधील मयूर इंड या कारखान्याच्या आवारातून कोट्यवधी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले आहे,मोहोळ तालुक्यातील चंद्रमौळी औद्योगिक वसाहतीतील बंद पडलेल्या स्वामी समर्थ कंपनी केमिकल्स नावाच्या कारखान्यातून नाशिक पोलिसांनी कोट्यवधी रुपयांचा एमडी ड्रग्ज व कच्चा माल जप्त केला आहे.या दरम्यान सोलापूर जिल्ह्यातील अन्न व औषध प्रशासन विभाग झोपा काढत होते का ? की फक्त हप्ते घेण्यामध्ये अन्न व औषध प्रशासन विभाग दंग होते का ? असा सवाल जनतेमध्ये उपस्थित होत आहे.असे निवेदनात म्हटले आहे.

संपूर्ण देशात महाराष्ट्र राज्याचे नाव खराब करण्याचे काम ललित पाटील प्रकरणाने केले असून यामध्ये महाराष्ट्र राज्यात उपलब्ध असलेल्या अन्न व औषध प्रशासन सोलापूर विभागाने ड्रग्ज निर्मिती प्रकरणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे,त्यामुळे कामामध्ये हलगर्जीपणा,कर्तव्यात कसूर,केल्याप्रकरणी सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुका प्रभारी असलेल्या अधिकारी यांना यांना मोहोळ तालुक्यातील ड्रग्ज निर्मिती आणि जप्ती प्रकरणात तात्काळ निलंबित करून त्यांची खातेनिहाय चौकशी करण्यात यावी.आणि त्यांना कायम सेवेतून बडतर्फ करण्यात यावे अन्यथा आपल्या विरोधात आझाद मैदान येथे महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने ६ डिसेंबरला तीव्र स्वरूपात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom