इंदापूर महावितरणला महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे निवेदन…!

इंदापूर महावितरणला महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे निवेदन…!

५ डिसेंबर रोजी करणार आंदोलन..!

प्रतिनिधी – इंदापूर : महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पुणे जिल्हा संघटक अविराज माने यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र विकास शेतकरी सेनेचे तालुका अध्यक्ष श्री हनुमंत शिंदे यांनी इंदापूर महावितरण चे उप अभियंता श्री जाधव साहेब यांना निवेदन दिले आहे. सुरवड ते भांडगाव रोड वरील दडस वस्ती नजिक आपल्या लाईन चा तरा ह्या पूर्ण पने खाली लटकलेल्या आहेत व त्यामुळे येणाऱ्या ऊस ट्रॅक्टर ला आणि मोठ्या वाहतूक करणाऱ्या वाहनांना व सर्वच शेतकऱ्यांना खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहे मागिल सहा महिन्यापूर्वी त्याच तारे मुळे मका भरून आलेल्या ट्रॅक्टर ट्रॉली ला आग लागून शेतकऱ्याची मका व ट्रॅक्टर ट्रॉली जळून खाक झाली होती त्यामुळे ह्या पण वर्षी सर्व शेतकरी बांधवांना हा त्रास सहन करावा लागत आहे तात्काळ आदेश देऊन लवकरात लवकर हे काम करून द्यावे असे निवेदनात म्हटले आहे.तसेच निवेदनाची दखल न घेतल्यास महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने महावितरण कार्यालयासमोर ५ डिसेंबर रोजी तीव्र स्वरूपाचे ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे.
या वेळी पुणे जिल्हा संघटक अविराज माने.इंदापूर तालुका अध्यक्ष हनुमंत शिंदे,खंडेराव सुर्वे,अशोक घोगरे,गुरुदेव घोगरे,मयूर घोगरे,रणजित सुतार आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom