एस स्टी कर्मचाऱ्यांचा बंद असलेला कर्ज पुरवठा त्वरीत चालू करावा – महाराष्ट्र विकास सेना पक्षाची मागणी..
प्रतिनिधी : पंढरपूर : महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पक्षप्रमुख किरण साठे यांच्या मार्गदर्शनाखाली स्टेट ट्रान्सपोर्ट को ऑपरेटिव्ह बँक लि.पंढरपूर बँकेच्या माध्यमातून एसटी मध्ये कार्यरत असलेल्या सर्वच सभासद व कर्मचाऱ्यांना बंद असलेला कर्जपुरवठा त्वरीत चालू करावा अशी मागणी राज्य समन्वयक मा अजितदादा साठे यांनी पंढरपूर शाखा व्यवस्थापक मा श्री गोसावी यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे,यावेळी राज्य कार्यकारिणी सदस्य आबासाहेब गोसावी, जिल्हा संघटक मा श्री सागर बडवे,पंढरपूर तालुकाध्यक्ष मा श्री अर्जुन शेटे,मा रोहित वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते… स्टेट ट्रान्सपोर्ट को ऑपरेटिव्ह बॅंक ही सभासद व कर्मचाऱ्यांची आर्थिक नाडी आहे.मात्र गेली दोन ते तीन महिने या बँकेतून कर्जपुरवठा बंद करण्यात आला आहे.त्यामुळे सभासद असलेल्या कर्मचाऱ्यांना आर्थिक परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे.या बँकेची कष्टकऱ्यांची बँक म्हणून नावलौकिक आहे.मात्र कष्टकऱ्यांची गळचेपी करण्याचे काम सध्या या बँकेच्या माध्यमातून चालू आहे ते त्वरित थांबवले पाहिजे.कर्जपुरवठा बंद असल्याने सभासद असलेल्या कर्मचाऱ्यांच्या मुलांना शाळेसाठी, तसेच शेतीसाठी,मुलींच्या लग्न कार्यासाठी आर्थिक अडचण निर्माण झाली आहे.या बॅंकेच्या माध्यमातून कर्ज मिळविणे हा सभासद कर्मचाऱ्यांचा हक्क अधिकार असून त्यावरती गदा आणण्याचा प्रयत्न केला जात आहे तो थांबवावा आणि एस स्टी कर्मचाऱ्यांना त्वरीत कर्ज पुरवठा चालू करावा अन्यथा दि ४ / १२ / २०२३ रोजी महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
स्टेट ट्रान्सपोर्ट ऑपरेटिव्ह बँकेच्या माध्यमातून गेली दोन ते तीन महिने झाले कर्मचाऱ्यांना कर्जपुरवठा बंद करण्यात आला आहे,त्यामुळे कर्मचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असून त्यांची हक्काची असलेली बँक कर्ज देत नसल्याने एसटी कर्मचारी आर्थिक अडचणीत आले आहेत,त्यामुळे स्वतः एसटी कर्मचारी आणि महाराष्ट्र विकास सेना पक्षाचा कार्यकर्ता असल्याने आंदोलनाला उपस्थित राहणार आहे
आबासाहेब गोसावी- राज्य कार्यकारणी सदस्य- महाराष्ट्र विकास सेना पक्ष
