
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या विरोधात अकलूज येथे मविसेचा विराट मोर्चा
माळीनगर व सवतगव्हाण येथील पालखी महामार्गाच्या मोबदल्याची चौकशी करण्याची मागणी.
चौकशी समिती स्थापन न केल्याने दुसऱ्या दिवशीही बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु…
प्रतिनिधी : महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने अकलूज येथील साहित्यरत्न डॉ आण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासमोर दिनांक ९/६/२०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर (भूसंपादन समन्वय शाखा) यांनी दिनांक -०७/०४/२०२५ रोजी जा.क्र.२०२५/भूसं/कार्या-१/आर आर ९५५/२०२५ चे जिल्हाधिकारी कार्यालयला पाठविलेल्या पत्रानुसार माळशिरस तालुक्यातील संत तुकाराम महाराज पालखी महामार्गामध्ये मौजे माळीनगर मधील स.नं.६,स.नं १३तसेच सवतगव्हाण हद्दीत स.न ४२ आणि स.न ४३ मधील भूसंपादन झालेल्या व त्याचा लाभ मिळालेल्या मोबदल्याची चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे प्रदेश सचिव अनिल साठे यांच्या नेतृत्वाखाली विराट हलगी मोर्चा काढण्यात आला. मोर्चाला पक्षप्रमुख किरण साठे यांची प्रमुख उपस्थिती होती.
संत तुकाराम महाराज पालखी महामार्गामध्ये माळशिरस तालुक्यातील मौजे माळीनगर मधील स.न.६ आणि स.न १३ तसेच सवतगव्हाण हद्दीत स.न ४२ आणि स.न ४३ मधील भूसंपादन झालेल्या व त्याचा लाभ मिळालेल्या मोबदल्याची चौकशी करणेबाबत दिनांक २०/२/२०२५ रोजीच्या निवेदनाच्या अनुषंगाने उपविभाग अधिकारी,माळशिरस,अकलूज यांचा अहवाल संदर्भीय पत्राद्वारे इकडील कार्यालयास प्राप्त झालेला आहे,सदरचा अहवाल मा. जिल्हाधिकारी यांचे निदर्शनास आणून त्यावर उचित कार्यवाही करून आपणास कळविण्यात येईल. तरी आपण बेमुदत ठिय्या आंदोलन व थाळीनाद आंदोलन करू नये असे पत्र प्रदेश सचिव अनिल साठे यांना जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर यांच्यावतीने दिनांक ०७/०४/२०२५ रोजी देण्यात आले.
सदर तक्रारी निवेदनाच्या अनुषंगाने उपविभागीय अधिकारी माळशिरस विभाग अकलूज यांनी स्वतः च्या कार्यालयाच्या विरोधामध्ये तक्रार असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाने चौकशी करावी असे पत्र पाठविले आहे.तक्रारीच्या अनुषंगाने अपेक्षित अशी कागदपत्रे,पुरावे उपलब्ध आहेत, असे निवेदनात म्हटले आहे,तरी जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर (भूसंपादन समन्वय शाखा) यांनी पाठविलेल्या पत्रानुसार चौकशी समिती तात्काळ स्थापन करण्यात यावी यासाठी ९/६/२५ रोजी अकलूज येथे हलगी मोर्चा काढण्यात आला.तसेच चौकशी समिती स्थापन करण्यात आली नाही त्यामुळे महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने अकलूज येथील साहित्यरत्न डॉ आण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासमोर चौकशी पूर्ण होईपर्यंत बेमुदत ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली आहे.आंदोलनाचा दुसरा दिवस आहे.