
कण्हेर येथे महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात
प्रतिनिधी : माळशिरस तालुक्यातील कण्हेर गावातील ग्रामस्थांच्या विविध प्रश्नासाठी महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने संपर्क प्रमुख बाळासाहेब कांबळे यांच्या व माळशिरस तालुका अध्यक्ष बापुसाहेब वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
बेमुदत धरणे आंदोलनाला महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पक्षप्रमुख किरण साठे यांनी भेट दिली.यावेळी आंदोलनकर्ते महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे संपर्क प्रमुख बाळासाहेब कांबळे,तालुका अध्यक्ष बापूसाहेब वाघमारे,उमाजी आण्णा मिसाळ,नितीन मिसाळ, रोहित नलावडे,सागर होणमाने सागर मिसाळ,आप्पा लोखंडे,मनोज काशिद यांच्यासह कण्हेर गावातील शाखेचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.आंदोलनाच्या मागण्या संदर्भात कण्हेर गावचे सरपंच बाजीनाना माने व ग्रामसेवक हनुमंत वगरे यांच्याशी आंदोलनस्थळी सकारात्मक चर्चा झाली.