महाराष्ट्र सरकार व बांधकाम विभागाच्या विरोधात अकलूजमध्ये विराट हलगी मोर्चा

महाराष्ट्र सरकार व बांधकाम विभागाच्या विरोधात अकलूजमध्ये विराट मोर्चा

मुख्य अभियंता व सहाय्यक कार्यकारी अभियंता म्हस्के यांना निलंबित करण्याची मागणी

अकलूजमध्ये चौथ्या दिवशीही आंदोलन सुरूच….

प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिव यांना निवेदन देवून पुणे प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता व सार्वजनिक बांधकाम विभाग अकलूज उपविभाग क्र २ चे सहाय्यक कार्यकारी अभियंता श्री म्हस्के यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी मविसेचे प्रदेश सचिव अनिल साठे यांनी केली होती,मात्र त्यांच्यावर कारवाई करण्यात आली नसल्याने महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने अकलूजमध्ये विराट हलगी मोर्चा काढण्यात आला आणि मागणी मान्य न झाल्याने साहित्यरत्न डॉ अण्णाभाऊ साठे यांच्या स्मरकासमोर १० जून पासून बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे.धरणे आंदोलनाचा चौथा दिवस आहे.सद्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे पुणे प्रादेशिकचे मुख्य अभियंता श्री.चव्हाण साहेब यांच्या कार्यकाळात सोलापूर जिल्ह्यात अतिशय बेजबाबदारपणे काम सुरू आहे.माळशिरस तालुक्यातील अकलूजमधील जुने एसटी स्टँड ते नवीन एसटी स्टँड व अकलूज ते विझोरी रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याच्या मागणीसाठी मंत्रालय,पुणे प्रादेशिक कार्यालय पुणे यांच्या कार्यालयासमोर जानेवारी २०२५ पासुन आंदोलने,मोर्चे,उपोषणे करण्यात आली आहे.त्या अनुषंगाने मुख्य अभियंता यांनी प्रत्येक्ष कोणत्याही प्रकारे लक्ष न देता त्यांनी अतिक्रमण धारक व सहाय्यक कार्यकारी अभियंता श्री म्हस्के यांना पाठिशी घालण्याचे काम केले आहे.तसेच श्री म्हस्के साहेब यांनी मागणीच्या अनुषंगाने सतत दिशाभूल करणारी माहिती दिली आहे,पुणे विभागाचे सहायक मुख्य अभियंता यांच्या आदेशाचे उल्लंघन केले आहे,त्यांचीही दिशाभूल केली आहे,श्री. म्हस्के यांना अतिक्रमण धारकांचे काम करण्यात रस असून कायदा राबविण्यात त्यांना रस नाही श्री म्हस्के यांचे प्रमोशन होणार असल्याने त्यांनी कर्तव्यात कसूर केली आहे आणि त्यांना पाठिशी घालण्याचे काम मुख्य अभियंता श्री चव्हाण हे करीत आहेत तरी श्री म्हस्के आणि मुख्य अभियंता श्री चव्हाण यांना तात्काळ निलंबित करण्याची कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन येणार असल्याचे प्रदेश सचिव अनिल साठे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom