छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचे वारसदार कधी पेटून उठणार ? – किरण साठे
फडतूस त्रिवेदी,देवेंद्र फडणवीस,भाजपचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध..
प्रतिनिधी : अकलूज : छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणाऱ्या सुधाशु त्रिवेदीला नागपूर येथील कार्यक्रमात निमंत्रित करणाऱ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस व बहुजन ब्रिगेडचे अध्यक्ष किरण साठे यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय अधिकारी अकलूज यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांना निवेदन पाठवून निषेध नोंदविण्यात आला.निवेदन वरीष्ठ क्लार्क ए.एस.मोमीन यांनी स्वीकारले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस तथा बहुजन ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष किरण साठे,राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष( सांस्कृतिक विभागा) हनुमंत पाटोळे,राष्ट्रवादी काँग्रेसचे अकलूज शहराध्यक्ष सुरेश गंभीरे,युवक तालुका उपाध्यक्ष जाकीर शेख,राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष इरफान बागवान,युवक शहराध्यक्ष अविनाश सोनवणे,समता परिषदेचे तालुका अध्यक्ष पिंटू एकतपुरे,बहुजन ब्रिगेडचे अकलूज शहराध्यक्ष आनंद मिसाळ,अल्पसंख्याक शहराध्यक्ष रहीम शेख,सचिव जुबेर बागवान,रफिक मुलाणी,रोहन काटे,पिंटू अडगळे,इत्यादी उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्रहरण करून त्यांचा नको त्या भाषेत अपमान केला जात असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे वारसदार कधी पेटून उठणार आहेत? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस आणि बहुजन ब्रिगेडचे अध्यक्ष किरण साठे यांनी उपस्थित केला आहे.
भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी अनेकवेळा जाहीररित्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केलेला असताना ज्यांनी महाराजांचा अपमान केला आशा फडतूस सुधाशु त्रिवेदी ला भारतीय जनता पक्ष बोलावून त्यांना पहिल्या रांगेत बसवत असेल आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनुयायांच्या जखमेवर मीठ चोळत असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे वारसदार काय झोपा काढणार काय ? ते कधी पेटून उठणार आहेत,छत्रपती शिवाजी महाराजांचा फक्त मतापूरता वापर करण्याऱ्या भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आपण आवाज उठवू शकलो नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे वारसदार म्हणवून घेण्याचा आपल्याला अधिकारच नाही असा प्रश्न उपस्थित करीत किरण साठे यांनी संताप व्यक्त केला,त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या सुधाशु त्रिवेदीला नागपूर येथील कार्यक्रमात निमंत्रित करणाऱ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाचा तसेच फडतूस सुधाशु त्रिवेदी चा जाहीर निषेध व्यक्त करण्यात येत असल्याचे सांगितले.
