नातेपुते पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी आणि पोलीस कर्मचारी राऊत यांच्या चौकशीसाठी पोलीस उपअधीक्षक यांच्या कार्यालयासमोर १० एप्रिलला तीव्र आंदोलन तर, १७ एप्रिलला पोलिस अधीक्षक सोलापूर यांच्या कार्यालयासमोर आंदोलन
पोलीस स्टेशनमधील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची मागणी
प्रतिनिधी : नातेपुते : नातेपुते पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी आणि पोलीस कर्मचारी राऊत यांच्यावर चौकशी करून कारवाई करण्याच्या मागणीसाठी बहुजन ब्रिगेड संघटनेच्या वतीने अकलूजमधील उपविभागीय पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयासमोर दिनांक १० एप्रिल रोजी तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष किरण साठे यांनी सांगितले.
नातेपुते पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले प्रभारी अधिकारी आणि पोलीस कर्मचारी राऊत यांनी मारकडवाडी येथील श्री रामचंद्र वाघमोडे यांना दिनांक २८ मार्च रोजी सकाळी साडे आकाराचा सुमारास पोलीस स्टेशनमध्ये बोलावून घेवून वाघमोडे यांच्यावर गुन्हा दाखल केला असल्याची माहिती दिली,वाघमोडे यांनी स्वतःवर कोणता गुन्हा दाखल झाला आहे अशी माहिती विचारली असता श्री राऊत यांनी त्यांना सिव्हिल ड्रेस वर असताना मारहाण केली आहे,त्यानंतर तुम्हाला मारहाण करण्याचा अधिकार आहे का? असे वाघमोडे यांनी राऊत पोलीस कर्मचारी यांना विचारले असता नातेपुते पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांनी तू लय आवाज करून नको नाही तर तुला ३०७ मध्ये अडकवून टाकेन अशी धमकी दिली असल्याची माहिती श्री वाघमोडे यांनी बहुजन ब्रिगेड संघटनेकडे लेखी अर्ज देवून दिली आहे,असे निवेदनात म्हटले आहे.तसेच न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे,तरी आमच्या निवेदनाच्या अनुषंगाने या सर्व प्रकरणाचे दिनांक २८ मार्च रोजीच्या सकाळी ११.३० ते दुपारी ३ वाजेपर्यंत चे सीसीटीव्ही फुटेज तपासून दोषी आढळणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी अकलूजमधील उपविभागीय पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयासमोर १० एप्रिल रोजी तीव्र स्वरूपात आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात दिला आहे.तसेच संबंधित प्रकरणाची दखल तात्काळ घेण्यात आली नाही तर १७ एप्रिलला सोलापूर येथील पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
