चौडेश्वरवाडी येथील उषाताई साठे खूनप्रकरण: खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी मंजूर;सकल बहुजन समाजाच्या मोर्चाला मोठे यश!

अकलूज: चौडेश्वरवाडी येथील उषाताई साठे यांच्या निर्घृण खून प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी आणि हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला जावा, या मागणीसाठी माळखांबी येथे काढण्यात आलेल्या सकल बहुजन समाजाच्या भव्य मोर्चाला अखेर मोठे यश आले आहे. या आंदोलनाची प्रशासनाने तातडीने दखल घेतली असून, याबाबतचे मागणी निवेदन संबंधित वरिष्ठ विभागाकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्यात येत असल्याचे लेखी पत्र पोलिसांनी आंदोलक प्रमुखांना दिले आहे.१२ जुलै रोजी सकल बहुजन समाजाच्या वतीने माळखांबी येथे पीडित महिलेचे पती विजय साठे, त्यांच्या कुटुंबातील सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीत व महाराष्ट्र विकास सेना पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा पक्षप्रमुख किरण साठे यांच्या नेतृत्वाखाली या तीव्र अन्यायाविरोधात विराट मोर्चा काढण्यात आला होता. पीडित कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळावा आणि खटल्याची सुनावणी जलदगती न्यायालयात (फास्ट ट्रॅक कोर्ट) व्हावी, ही या मोर्चातील मुख्य मागणी होती.या जनक्षोभाची दखल घेत, तपास अधिकारी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी (डीवायएसपी), माळशिरस विभाग, अकलूज यांनी आंदोलक आणि मोर्चाचे मुख्य आयोजक बिभीषण साठे, सतीश साठे, महेश साठे आणि विशाल साठे यांना अधिकृत लेखी पत्र सुपूर्द केले. या पत्रात, “सकल बहुजन समाजाच्या वतीने देण्यात आलेले निवेदन संबंधित कायदेशीर व वरिष्ठ विभागाकडे तत्परतेने पाठवण्यात येत आहे,” असे स्पष्ट आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले आहे.प्रशासनाने आंदोलकांच्या न्याय्य मागणीवर सकारात्मक पाऊल उचलल्यामुळे सकल बहुजन समाजात व सर्वसामान्य जनतेत समाधानाचे वातावरण आहे. आता या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून नराधमांना फाशीची शिक्षा कधी मिळते,याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom