अकलूजकरांसाठी गूड न्यूज! किरण साठे यांच्या पाठपुराव्याला यश; वीर धरणातून ‘नीरा उजव्या कालव्या’द्वारे पाणी सुटले

अकलूजकरांसाठी गूड न्यूज! किरण साठे यांच्या पाठपुराव्याला यश; वीर धरणातून ‘नीरा उजव्या कालव्या’द्वारे पाणी सुटले

अकलूज : अकलूजकरांची पाण्यासाठीची वणवण अखेर थांबणार आहे. शहरात निर्माण झालेल्या तीव्र पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र विकास सेना पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष किरण साठे यांनी केलेल्या आक्रमक पाठपुराव्याला मोठे यश आले आहे. वीर भाटगर धरणातून दिनांक ६ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ७:३० वाजता नीरा उजव्या कालव्यातून ४०० क्युसेक आणि डाव्या कालव्यातून ३०० क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.१२ जुलैचे आवर्तन ६ जुलैलाच आले धावून.अकलूज नगरपरिषदेच्या ढिसाळ नियोजनामुळे आणि पाण्याच्या गैरव्यवस्थापनामुळे गेल्या काही दिवसांपासून अकलूजमधील जनतेला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. नगरपरिषदेच्या याच कारभाराचा भांडाफोड करत किरण साठे यांनी प्रशासनाला धारेवर धरले होते. केवळ टीका करून न थांबता, त्यांनी नीरा उजवा कालवा विभाग (फलटण) चे कार्यकारी अभियंता रावसाहेब मोरे यांच्याकडे तात्काळ पाणी सोडण्यासाठी सातत्याने वजनदार पाठपुरावा केला.या जनरेट्याची दखल घेत, कार्यकारी अभियंता रावसाहेब मोरे यांनी शासनाकडून विशेष परवानगी मिळवली. परिणामी, जे आवर्तन आगामी १२ जुलै रोजी सोडले जाणार होते, ते तब्बल ६ दिवस आधी म्हणजेच ६ जुलै रोजीच सोडण्यात आले आहे. (या संदर्भात अकलूज नगरपरिषदेनेही पाणी सोडण्याची मागणी लावून धरली होती.)जनतेतून समाधान, नगरपरिषदेला चपराक बसली आहे.ऐन पावसाळ्यातही अकलूजकरांना पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संताप होता. मात्र, किरण साठे यांनी दाखवलेली तत्परता आणि पाटबंधारे विभागाच्या तातडीच्या निर्णयामुळे अकलूज शहराचा पाण्याचा प्रश्न तूर्तास मिटला आहे. कालव्यातून पाणी सुटल्याचे वृत्त समजताच अकलूजमधील जनतेने सुटकेचा श्वास सोडला असून, साठे यांच्या या यशस्वी प्रयत्नांचे सर्वत्र कौतुक होत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom