दत्तात्रय देशमुख आणि शिव देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करून मोका’लावण्याच्या मागणीची घेतली दखल;

चौडेंश्वरवाडी येथील उषा साठे खून प्रकरण:

पोलीस महासंचालकांकडून चौकशीचे आदेश !

मुंबई: प्रतिनिधी:चौडेंश्वरवाडी येथील गाजलेल्या उषा साठे खून प्रकरणात आता एक मोठी आणि खळबळजनक घडामोड समोर आली आहे. या प्रकरणातील संशयित दत्तात्रय देशमुख आणि शिव देशमुख यांना मुख्य आरोपी करण्यात यावे, तसेच त्यांच्यावर संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (MCOCA – मोका) कारवाई करण्यात यावी, या मागणीची थेट पोलीस महासंचालकांनी (DGP) गंभीर दखल घेतली आहे. या संदर्भात पोलीस महासंचालकांनी कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक (IGP) यांना सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या दोन्ही संशयितांना लवकरच आरोपी केले जाणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.उषा साठे यांच्या निर्घृण खुनानंतर आरोपींना पाठीशी घातले जात असल्याचा आरोप करत ‘महाराष्ट्र विकास सेना पार्टी’ने या प्रकरणात आक्रमक भूमिका घेतली होती. पक्षाच्या वतीने ८ जुलै रोजी पोलीस महासंचालकांना एक सविस्तर निवेदन सादर करण्यात आले होते. या निवेदनात दत्तात्रय देशमुख आणि शिव देशमुख यांच्यावर थेट गुन्हे दाखल करून ‘मोका’ लावण्याची मागणी करण्यात आली होती.तसेच आरोपी जगन्नाथ देशमुख यांना अटक करण्याची मागणी ही करण्यात आली होती.या निवेदनाच्या अनुषंगाने पोलीस महासंचालकांनी महाराष्ट्र विकास सेना पार्टीच्या शिष्टमंडळाला गुरुवारी, १६ जुलै रोजी मुंबईत भेटीची वेळ दिली होती. या अत्यंत महत्त्वपूर्ण बैठकीत पक्षाच्या शिष्टमंडळाने पोलीस महासंचालकांसमोर या खून प्रकरणातील अनेक गंभीर बाजू मांडल्या.महाराष्ट्र विकास सेना पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा पक्षप्रमुख किरण साठे यांनी या बैठकीविषयी माहिती देताना सांगितले की, “पोलीस महासंचालकांनी आमच्या मागण्या अत्यंत गांभीर्याने ऐकून घेतल्या. त्यांनी तातडीने या प्रकरणाची दखल घेत कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक यांना संबंधित संशयितांची चौकशी करून कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.पोलीस महासंचालकांच्या भेटीला गेलेल्या या उच्चस्तरीय शिष्टमंडळात पक्षाचे प्रमुख किरण साठे यांच्यासह प्रदेश सचिव अनिल साठे,बाळासाहेब कांबळे,राजेश खरे,सतीश साठे, बीभीषण साठे,महेश साठे, सत्यवान लोंढे आदी पदाधिकारी उपस्थित होते.वरिष्ठ पातळीवरून थेट चौकशीचे आदेश आल्यामुळे आता स्थानिक पोलीस प्रशासनात प्रचंड खळबळ उडाली असून,आगामी काळात दत्तात्रय देशमुख आणि शिव देशमुख यांच्यावर काय कायदेशीर कारवाई होते, याकडे संपूर्ण परिसराचे डोळे लागले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom