गुरसाळे येथे बहुजन ब्रिगेडच्या वतीने आण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी
प्रतिनिधी—गुरसाळे–साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त व जन्मशताब्दी वर्षानिमित्त गुरसाळे ता.पंढरपूर येथील आण्णा भाऊ साठे नगर त्यांच्या प्रतिमेला मनसे चे सोलापूर जिल्ह्याचे युवा नेते अमोल घोडके व बहुजन ब्रिगेड सोलापूर जिल्हा संघटक नानासाहेब खंडाळे पत्रकार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी विशाल वाघमारे अमरदीप लोखंडे नीलेश वाघमारे संदीप तूपसौंदर श्रीराम वाघमारे अजय वायदंडे किशोर वाघमारे गणेश वाघमारे विजय वाघमारे नागनाथ खंडाळे उपस्थित होते.
