अकलूजमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व बहुजन ब्रिगेडच्या वतीने आण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन
प्रतिनिधी—अकलूज
साहित्यरत्न,सत्यशोधक, साहित्यसम्राट आण्णाभाऊ साठे यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त व जन्मशताब्दी निमित्ताने अकलूजमध्ये असलेल्या स्मारकाला राष्ट्रवादी काँग्रेस व बहुजन ब्रिगेडच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले.सदर कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस व बहुजन ब्रिगेडचे कार्यकर्ते यांनी केले होते.
या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी पंचायत समिती सदस्य पांडुरंग देशमुख,राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्ह्याचे सरचिटणीस व बहुजन ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष किरण साठे,वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा कार्यध्यक्ष धीरज मोरे,लहुजी शक्ती सेनेचे माळशिरस तालुका अध्यक्ष नवनाथ साठे,जनसेवा मागासवर्गीय आघाडीचे तालुका अध्यक्ष रघुनाथ साठे,भारतीय दलित महासंघाचे तालुका अध्यक्ष आकाश लोखंडे,समता परिषदेचे तालुका उपाध्यक्ष आनंद एकतपुरे,बहुजन ब्रिगेडचे माढा लोकसभा अध्यक्ष सोमनाथ शेळके,बहुजन ब्रिगेडचे अकलूज शहराध्यक्ष आनंद मिसाळ,युवा ब्रिगेडचे अध्यक्ष उदय कांबळे,सन्मित्र संघाचे अध्यक्ष सुरेश गंभीरे,सूरज मोहिते,सिद्धार्थ साठे इत्यादी उपस्थित होते.



