खुडूस येथे युवा क्रांती सेना संघटनेच्या वतीने आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचीपुण्यतिथी साजरी

*खुडूस येथे युवा क्रांती सेना संघटनेच्या वतीने आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचीपुण्यतिथी साजरी*
—————————————————————
*खुडूस गावचे माळशिरस तालुका दैनिक पुण्यनगरीचे पत्रकार श्रीमंत बनकर यांचा सत्कार*
————————————————————-

खुडूस ता.माळशिरस येथे सशस्त्र क्रांतीचे जनक आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांची 139 वी पुण्यतिथी खुडूस गावचे सरपंच विनायक ठवरे,पोलीस पाटील डीएल कांबळे, माजी सरपंच अॅड.शहाजी ठवरे, युवा क्रांती सेना संघटनेचे संस्थापक /अध्यक्ष मकरंद साठे यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
तसेच खुडूस ता. माळशिरस येथील दैनिक पुण्यनगरीचे पत्रकार श्रीमंत बनकर यांना
सोलापूर येथे जिल्हा प्रशासनाकडून ग्रामीण भागात केलेल्या उत्कृष्ट पत्रकारिता लेखना बद्दल दिला जाणारा उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार या वर्षी दैनिक पुण्य नगरी चे माळशिरस तालुका प्रतिनीधी पत्रकार श्रीमंत बनकर याना मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ जिल्हाअभियान व्यवस्थापक मिनाक्षी मडवळी प्रकल्प संचालक अनिलकुमार नवाळे जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुध्द कांबळे उपाध्यक्ष दिलीप चव्हाण सभापती विजय डोंगरे स्वाती शटगार वसंत नाना देशमुख व इतर मान्यवर याचे शुभ हस्ते देण्यात आला त्याचे औचित्य साधून ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब वावरे, रिपाईचे राम कांबळे, फुले-शाहू-आंबेडकर मंडळाचे अध्यक्ष बापू लोंढे,डाॅ.बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बंडू कांबळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी धनाजी साठे,राजेंद्र कावरे बार्टीचे समतादूत किरण वाघमारे अभिजित साठे,शंकर सकट ,पोपट साठे, आदी कार्यकर्ते,ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom