
अखेर मळोलीते निमगाव रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे निष्पन्न—किरण साठे
प्रतिनिधी—निमगाव—मळोली ते निमगाव रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करून दोषी आढळणाऱ्या संबंधित अधिकारी व ठेकेदारावर कारवाई करा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने दिनांक १२फेब्रुवारी रोजी जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांच्या नेतृत्वाखाली अकलूज येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयासमोर तीव्र स्वरूपात ठिय्या आंदोलन करण्यात आले होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांच्या ठिय्या आंदोलनाची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागचे उप अभियंता,शाखा अभियंता यांनी सदर कामाच्या ठिकाणी ग्रामस्था सहित पाहणी केल्यानंतर ग्रामस्थांनी कामामध्ये कुठे निकृष्ठ दर्जाचे काम केले आहे ते निदर्शनास आणून दिले, त्यानंतर लगेच उपअभियंता श्री केदार साहेब यांनी संबंधित ठेकेदाराला निकृष्ठ दर्जाचे केलेले काम दुरुस्त करण्याच्या सूचना दिल्या,त्याप्रमाणे आज संबंधित ठेकेदाराने ज्या ठिकाणी निकृष्ठ दर्जाचे काम करण्यात आले होते, त्याठिकाणी लाली पावडर करून ते पॅच मारून दुरुस्ती करण्याचे काम चालू केले आहे. म्हणजेच हे काम निकृष्ठ दर्जाचे झाल्याचे निष्पन्न झाले आहे असे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी सांगितले.

याचाच अर्थ असा की हे निकृष्ठ दर्जाचे काम होत असताना व काम अंदाजपत्रकानुसार होत नसताना या कामाची जबाबदारी ज्या अधिकाऱ्यारती होती ते संबंधित अधिकारी त्या कामावर उपस्थित होते,मात्र निकृष्ठ दर्जाचे काम होत असताना उघड्या डोळ्यांनी पाहणाऱ्या संबंधित अधिकारी यांनी या ठेकेदाराला पाठिशी घातल्याचे निष्पन्न झाले आहे,संबंधित ठेकेदाराने ज्या ठिकाणी निकृष्ठ दर्जाचे काम झाले होते त्याच ठिकाणी पुन्हा काम चालू केल्याने हे काम निकृष्ठ दर्जाचे होते, हे सांगायला कोणत्या जोतिषाची गरज आहे असे मला वाटत नाही असेही किरण साठे म्हणाले व संबंधित कार्यकारी अभियंता,उपअभियंता, शाखा अभियंता यांना निलंबित करण्यात यावे व ठेकेदाराला काळ्या यादीमध्ये टाकण्यात यावे,या मागणीसाठी येत्या २४ फेब्रुवारी पासून सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता श्री साळुंखे साहेब यांच्या कार्यालयासमोर तीव्र स्वरूपात ठिय्या आंदोलन करणार असल्याचेही किरण साठे यांनी सांगितले.
