महुद एसटी बसस्थानकासाठी ५ कोटींचा निधी व १.५ एकर जागेची गरज; २ मार्च २०२६ च्या निवेदनानंतर जिल्हाधिकाऱ्यांचे तातडीने आदेश

किरण साठे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे महुद बस स्टँडचा विषय मार्गी लागण्याची खात्री- धनाजी कांबळे

प्रतिनिधी:सांगोला: सांगोला तालुक्यातील महुद बुद्रुक येथे नवीन एसटी बसस्थानक (ST Bus Stand) उभारण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र विकास सेनेचे पक्षप्रमुख श्री.किरण साठे यांनी २ मार्च २०२६ रोजी सोलापूरचे जिल्हाधिकारी मा. श्री.कुमार आशीर्वाद साहेब यांना प्रत्यक्ष भेटून सविस्तर निवेदन दिले होते.या निवेदनाची तातडीने दखल घेत सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाने त्याच दिवशी म्हणजेच २ मार्च २०२६ रोजी सांगोल्याच्या तहसीलदारांना या प्रकरणाची सविस्तर चौकशी करून विविध १२ विभागांच्या अभिप्रायांसह परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याचे लेखी आदेश (जा.क्र.२०२६/मशा/कार्या-३/३-क/आरआर-१५६) जारी केले आहेत.

*पत्रांमधील महत्त्वाचे संदर्भ आणि तारखांचा तपशील*

महाराष्ट्र विकास सेना पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा पक्षप्रमुख किरण साठे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या पत्रात महुद येथील बसस्थानकाच्या मागणीचा संपूर्ण इतिहास आणि तारखांचा दाखला दिला आहे:महुद येथील ग्रामस्थांनी सर्वप्रथम १२ डिसेंबर २०२५ रोजी नवीन बसस्थानकासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे विनंती अर्ज केला होता.या अर्जाची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या विभागीय वाहतूक अधिकाऱ्यांनी महुद येथे प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली व त्यानंतर १३ जानेवारी २०२६ रोजी विभागीय अभियंत्यांकडे सकारात्मक अहवाल सादर केला.त्यानंतर २७ जानेवारी २०२६ रोजी एसटी महामंडळाच्या सोलापूर विभागीय कार्यालयाने मुंबईतील महाव्यवस्थापक (बांधकाम) आणि जिल्हाधिकारी कार्यालयाला पत्र पाठवून जागेबाबत मंजुरीची प्रक्रिया पुढे नेली.या सर्व पार्श्वभूमीचा आधार घेत किरण साठे यांनी २ मार्च २०२६ रोजी जिल्हाधिकाऱ्यांना अंतिम निवेदन दिले, ज्यावर २ मार्च २०२६ रोजीच महसूल प्रशासनाने पुढील आदेशाची कार्यवाही सुरू केली.यामुळे महाराष्ट्र विकास सेना पार्टीची ताकद असल्याचे दिसून आले.

*महुदचे भौगोलिक महत्त्व आणि बसेसची संख्या:*

महुद हे सांगोला आगारांतर्गत पंढरपूर-मलहार पेठ राज्य महामार्ग आणि विजयनगर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील प्रमुख मध्यवर्ती केंद्र आहे.येथे रोज तब्बल १०६ बसेस ये-जा करतात. हक्काचे बसस्थानक नसल्यामुळे बसेस रस्त्यावर थांबतात, ज्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास होतो व वाहतुकीची कोंडी होते.१.५ एकर जागा आणि ५ कोटींचा निधी आवश्यक:एसटी महामंडळाच्या २७ जानेवारी २०२६ च्या पत्रानुसार, महुद येथे बसस्थानक बांधण्यासाठी किमान १.५ एकर जागा आणि बांधकामासाठी शासनाकडून ५ कोटी रुपये निधी मिळणे आवश्यक आहे. ही जागा विनामूल्य उपलब्ध करून देण्यासाठी किरण साठे यांनी शासकीय कृषी विभाग किंवा इरिगेशन (पाटबंधारे) विभागाची जमीन देण्याची आणि डी.पी.डी.सी. (जिल्हा नियोजन समिती) मधून ५ कोटींचा निधी मंजूर करण्याची मागणी केली आहे.

*तहसीलदारांना ‘या’ १२ प्रमुख अहवालांसह प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश*

जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार (महसूल) दिनेश पारगे यांनी सांगोला तहसीलदारांना या प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्याचे आदेश दिले असून जमीन मागणीच्या प्रस्तावासोबत खालील १२ महत्त्वाचे अहवाल व अभिप्राय जोडण्यास सांगितले आहे.:

१.उपअधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयाचा मोजणी नकाशा व आराखडा.२. जागा वन संज्ञेखाली नसल्याबाबत उप वनसंरक्षकांचा अहवाल.३. संबंधित यंत्रणेची प्रशासकीय मान्यता आणि बजेट आराखडा.४. सहाय्यक संचालक, नगररचना विभाग, सोलापूर यांचा स्वयंस्पष्ट अभिप्राय.५. सदर जागा ‘गायरान’ आहे अथवा कसे, याबाबतचा अहवाल आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO, जिल्हा परिषद) यांचे शिफारस पत्र (शासन निर्णय दि. १२.०७.२०११ मधील निर्देशानुसार).६. संबंधित ग्रामपंचायतीचे मासिक व ग्रामसभेचे ठराव.७. स्थानिक विकास योजनेचा नकाशा.८. ५० वर्षांचे ७/१२ उतारे व सर्व फेरफार मंडळाधिकाऱ्यांच्या पंचनाम्यासह.९. दुय्यम निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी यांच्याकडून संबंधित जागेचे मूल्यांकन.१०. संबंधित कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभागाचा अभिप्राय.११. संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) यांचा अभिप्राय.१२. संबंधित कार्यकारी अभियंता, महावितरण (MSEDCL) यांचा अभिप्राय.

*उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना*

तहसीलदारांनी स्वतःच्या पातळीवर या सर्व संबंधित विभागांचे अभिप्राय गोळा करून, परिशिष्ट अ, ब, क, ड मध्ये माहिती भरून हा अहवाल परिपूर्ण असल्याची खात्री करावी. त्यानंतर हा अंतिम प्रस्ताव उपविभागीय अधिकारी (SDO) यांच्यामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करावा,असे आदेशात स्पष्ट केले आहे.किरण साठे यांच्या महत्त्वपूर्ण पाठपुराव्यामुळे महुद परिसरातील सर्वसामान्य जनतेच्या जिव्हाळ्याचा असलेला बसस्थानकाचा प्रश्न आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. महाराष्ट्र विकास सेना पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा पक्षप्रमुख किरण साठे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या पाठपुराव्यामुळे महुद बस स्टँड चा विषय मार्गी लागणार आहे.अशी खात्री असल्याचे महुद ग्रामपंचायत चे सदस्य धनाजी कांबळे यांनी सांगितले.किरण साठे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळेच कार्यवाही सुरू झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom