कार्यक्रम अधिकारी (म.बा.वि)यांना निलंबित करण्याच्या मागणीसाठी बहुजन ब्रिगेडचे १२अक्टोबर रोजी ठिय्या आंदोलन
प्रतिनिधी—सोलापूर–बहुजन ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष किरण साठे यांनी मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांना श्री जावेद शेख कार्यक्रम अधिकारी (म.बा.वि.)यांना त्वरित निलंबित करण्यात यावे आशा आशयाचे निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला आहे,माळशिरस तालुक्यातील माळशिरस पोलीस स्टेशनमध्ये श्री जावेद शेख कार्यक्रम अधिकारी(म.बा. वि.)जिल्हा परिषद सोलापूर यांच्यावर अनुसूचित जातीआणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम १९८९ ३(१)(p),३(१)(q),३(१)(r),३(१)(s),३(१)(u),(३)२ या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
सदर प्रकरणामध्ये श्री जावेद शेख साहेब यांच्याविरोधात गुन्हा दाखल झालेला असल्याने त्यांच्या सेवा पुस्तकामध्ये तशी नोंद करण्यात यावी,तसेच त्यांचे प्रमोशन होणार असेल तर ते या गुन्ह्याचा निकाल लागेपर्यंत स्थगित करण्यात यावे,त्याचप्रमाणे या गुन्ह्याचा निकाल जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत त्यांना कामावर रुजू करून घेऊ नये.त्याचप्रमाणे श्री जावेद शेख कार्यक्रम अधिकारी(म.बा.वि.)जिल्हा परिषद सोलापूर यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे तसेच संबंधित अधिकारी यांना निलंबित करण्याचा अधिकार आपल्याला नसल्यास त्याचा प्रस्ताव आपण त्यांच्या संबंधित वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे त्वरित पाठवावा अशी मागणी केली असून त्यांच्यावर कारवाई न केल्यास मुख्यकार्यकारी अधिकारी सोलापूर जिल्हा परिषद यांच्या कार्यालयासमोर १२अक्टोबर २०२०रोजी पासून बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा बहुजन ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष किरण साठे यांनी दिला आहे.सदर निवेदनाच्या प्रति,मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई,महिला बालविकास मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई,जिल्हाधिकारीसो-सोलापूर जिल्हा यांना पाठविण्यात आल्या आहेत.
