मांडवे येथे घर तिथे अर्सेनीक अल्बम गोळ्या वाटप करणार- दादा कर्चे
नातेपुते प्रतिनिधी – आधार बहुउद्येशीय संस्था संस्थापक अध्यक्ष, स्वयंभू फाऊंडेशन उपाध्यक्ष, बहुजन ब्रिगेड प्रमुख संघटक दत्ता बाबा कर्चे यांच्या मार्गदर्शनाखाली
मांडवे ता माळशिरस येथे घर तिथे अर्सेनीक अल्बम गोळ्या व मास्क वाटप करणार असल्याचे यावेळी आधार बहुउद्येशीय संस्था उपाध्यक्ष दादा कर्चे यांनी यावेळी सांगितले.
मांडवे व परिसरातील नागरिकांना चार तारखेला अर्सेनीक अल्बम गोळ्या व मास्क वाटप केले होते. कार्यसम्राट समाजसेवक दत्ता कर्चे यांच्या मार्गदर्शनाखाली वाडी वस्ती वरील शेतकरी, मजूर यांना याचा लाभ मिळावा या साठी घरो घरी जाऊन कोरोना च्या महामारी मधे नागरीकांना अर्सेनीक अल्बम गोळ्यांचे महत्व पटवून व माहिती पत्रक देऊन रोग प्रतीकारक शक्ती वाढण्यासाठी या गोळ्यांचा वापर योग्य पद्धतीने करावा असे या वेळी ऋषीकेश पालवे यांनी सांगीतले. गोळ्यांचे वाटप हे 5 तारखे पासून घरो घरी जाऊन करण्यात येत आहे या वेळी सोबत विकास बनसोडे, माऊली पालवे,प्रकाश सुतार,अक्षय पालवे, राहूल शेंडगे, इंद्रजित कर्चे, ऋषीकेश पालवे, श्रवण कर्चे व पदाधिकारी उपस्थित होते.

