माळशिरस गटविकास अधिकारी यांच्या विरोधात १२ अक्टोबरला राष्ट्रवादी काँग्रेसचे बोंबाबोंब आंदोलन
प्रतिनिधी—सोलापूर—मुख्यकार्यकारी अधिकारी सोलापूर जिल्हा परिषद यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सोलापूर जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी माळशिरस तालुक्यातील विकास आराखड्यात असलेल्या अकलूज सह आठ गावातील सन जानेवारी २०१९ ते ५ अक्टोबर २०२० रोजी पर्यत बांधकाम धारकांना दिलेल्या बांधकाम परवाण्यासाठी घेतलेल्या रकमेची प्रत्येक्ष बोलावून चौकशी करण्याच्या मागणीसाठी निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला आहे.
माळशिरस पंचायत समितीच्या माध्यमातून विकास आराखड्यात असलेली अकलूज सह आठ गावातील बांधकाम परवाना दिला जात आहे.तो परवाना दिला जात असताना पंचायत समितीच्या व शासनाच्या नियमानुसार त्याची रक्कम आकारली जात नसल्याची खात्रीशीर शंका निर्माण झाली आहे,त्यामुळे विकास आराखड्यात असलेल्या अकलूज सह आठ गावात दिलेल्या बांधकाम परवाना धारक यांच्याकडून संबंधित क्लार्क रक्कम घेऊन बँकेत जमा करीत असल्याचे सांगत असून या ठिकाणी ज्या बांधकाम धारकाला बांधकाम परवाना द्यावयाचा आहे,त्यालाच का त्याची एकूण रक्कम बँकेत जमा करण्यास सांगितले जात नाही,संबंधित क्लार्क याची रक्कम कोणाच्या सांगण्यावरून स्वतः कडे स्वीकारत आहेत हा मोठा पडलेला प्रश्न असून सन जानेवारी २०१९ ते ५ अक्टोबर २०२० या कालावधीत माळशिरस पंचायत समितीच्या माध्यमातून दिलेल्या बांधकाम परवानाधारकांची प्रत्येक्षरित्या बोलावून आपापल्या बांधकाम परवान्यासाठी किती रक्कम दिली आणि कोणाकडे दिली याची चौकशी करावी तसेच ज्या संबंधित कर्मचारी किंवा अधिकारी यांनी कोणाच्या आदेशाने ती रक्कम स्वीकारली याची चौकशी करून संबंधित दोषी आढळणाऱ्या प्रमुख जबाबदार अधिकारी यांच्यावर त्वरित निलंबनाची कारवाई करावी या मागणीसाठी जिल्हा परिषद सोलापूर यांच्या कार्यालयासमोर १२/१०/२०२० रोजी तीव्र स्वरूपात बोंबाबोंब आंदोलन करण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी सांगितले.
चौकट
माळशिरस पंचायत समितीच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या बांधकाम परवान्यासाठी बांधकाम धारक यांच्याकडून रोख रक्कम स्वीकारली जात आहे ती रक्कम गटविकास अधिकारी यांच्या आदेशाने स्वीकारली जात असल्याचे संबंधित कर्मचारी यांनी सांगितले असून याची सखोल चौकशी करून संबंधित गटविकास अधिकारी दोषी आढळल्यास त्यांच्यावर त्वरित कारवाई करावी.
किरण साठे-
सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस
सोलापूर जिल्हा
