सत्ताधारी पार्टीचा कर्दनकाळ उत्तमराव जानकर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत विजयी….

सत्ताधारी पार्टीचा कर्दनकाळ उत्तमराव जानकर कृषी उत्पन्न बाजार समितीत विजयी….

सत्ताधारी मोहिते पाटील गटात उडाली खळबळ…

प्रतिनिधी : अकलूज : सत्ताधारी मोहिते पाटील गटाने कृषी उत्पन्न बाजार समितीत अकलूज मध्ये केलेल्या कामाचा पर्दाफाश करण्यासाठी माळशिरस तालुक्यातील भाजपमधील मोहिते पाटील यांचे कट्टर विरोधक आणि त्यांचा कर्दनकाळ म्हणून काम करणारा लढवय्या नेता उत्तमराव जानकर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये ग्रामपंचायत गटातून 30 मतांनी विजय झाले आहेत. त्यामुळे सत्ताधारी मोहिते पाटील यांच्या गटामध्ये खळबळ उडाली आहे.उत्तमराव जानकर यांचा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये थेट प्रवेश झाल्याने सत्ताधारी मोहिते पाटील यांच्या चुकीच्या कामाचा आढावा घेऊन त्याला आळा घालून येणारा काळ सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी चांगला असून सत्ताधारी मोहिते पाटील यांच्यासाठी हा खडतर मार्ग निर्माण झाला असल्याची चर्चा संपूर्ण माळशिरस तालुक्यामध्ये मध्ये चालू आहे.

उत्तमराव जानकर यांच्या विजयी रूपाने मोहिते पाटील यांच्या गटाला आणि सत्तेला सुरुंग लागल्याची चर्चा माळशिरस तालुक्यामधील सर्वसामान्य जनतेमध्ये चालू आहे.उत्तमराव जानकर यांचा आवाज कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सत्ताधाऱ्याला धारेवर धरून सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी सज्ज झाला आहे, शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आवाज उठवणार असल्याची भूमिका उत्तमराव जानकर यांनी प्रचारामध्ये घेतली होती.त्याच अनुषंगाने उत्तमराव जानकर हे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सत्ताधारी सिंहाच्यासमोर वाघाच्या डरकाळीने सत्ताधाऱ्यांना घाम फोडल्याशिवाय राहणार नाही अशी चर्चा संपूर्ण माळशिरस तालुक्यामध्ये निर्माण झाली आहे.उत्तम जानकर यांचा विजय झाल्याने सत्ताधारी मोहिते पाटील यांच्या पायाखालची वाळू सरकली असून त्यांच्या गटांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली आहे.सत्ताधारी मोहिते पाटील गटाने एक हाती सत्ता मिळवली आहे पण उत्तम जानकर निवडणुकीत विजयी झाल्याने त्यांच्या गोटात शांतता पसरली असल्याचे पाहायला मिळते आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom