कमर क्लिनिकच्या संबंधित डॉक्टरांना पाठीशी घालण्याच्या उद्देशाने खोटी सर्टिफिकेट देणाऱ्या डॉक्टरांची नार्को टेस्ट करण्यासाठी बेमुदत ठिय्या आंदोलन–किरण साठे

कमर क्लिनिकच्या संबंधित डॉक्टरांना पाठीशी घालण्याच्या उद्देशाने खोटी सर्टिफिकेट देणाऱ्या डॉक्टरांची नार्को टेस्ट करण्यासाठी बेमुदत ठिय्या आंदोलन–किरण साठे

प्रतिनिधी–माळशिरस—उपविभागीय अधिकारी माळशिरस विभाग अकलूज यांच्या कार्यालयासमोर सुमित्रा नगर (यशवंतनगर )येथील कमर क्लिनिक (दवाखाना )यांची चौकशी करून रुग्णांना सेवा नाकारल्याने व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या नियमाचे उल्लंघन केल्याने व दवाखाना सतत बंद ठेवल्याने त्यांची मान्यता रद्द करण्यात यावी व मार्च ते ऑगस्ट महिन्यात किती रुग्णांना सेवा दिली याची चौकशी करावी तसेच दवाखाना मार्च ते ऑगस्ट महिन्यात किती वेळा उघडला आहे यासाठी त्यांच्या दवाखान्याचे सी सी टी व्ही फुटेज तपासावे व आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन करण्यात आले होते.

सदर आंदोलनाची दखल घेऊन उपविभागीय अधिकारी माळशिरस विभाग अकलूज सौ शमा पावर यांनी यशवंतनगर येथील सुमित्रा नगर येथील कमर क्लिनिकची चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्यात येऊन संबंधित अहवाल या कार्यालयाला पाठवा असा आदेश माळशिरस तालुक्याचे आरोग्यधिकारी यांना दिला होता.उपविभागीय अधिकारी अकलूज यांच्या आदेशानुसार माळशिरस तालुका आरोग्यधिकारी डॉ मोहिते यांनी कमर क्लिनिक सुमित्रा नगर(यशवंतनगर )याची चौकशी करण्यासाठी चौस्तरीय कमिटीची स्थापना केली असून त्यामध्ये अध्यक्ष म्हणून,यशवंतनगर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ संजय सिद,सदस्य म्हणून यशवंतनगर गावकामगार तलाठी,यशवंतनगर ग्रामपंचायत चे ग्रामसेवक,राजू शेख आरोग्य सहाय्यक प्रा.आ.केंद्र पिलीव यांचा सहभाग आहे.सदर क्लिनिक ची चौकशी सुरू असुन त्यामध्ये काय निष्पन्न होतेय ते पहाऊन मी पुढचे आंदोलन उभारणार आहे.

चौकट
यशवंतनगर मधील सुमित्रा नगर येथील कमर क्लिनिक याची चौस्तरीय कमिटीच्या वतीने चौकशी सुरू असून त्यामध्ये सदर क्लिनिक धारक यांनी त्यांच्या लेखी जबाबामध्ये काही अनफिट असल्याची मेडिकल सर्टिफिकेट सादर करून स्वतः निर्दोष असल्याचे सिद्ध करण्याचा प्रयत्न केल्यास तसेच त्यांच्या क्लिनिक मध्ये मुंबई नर्सिग होम ऍक्ट १९४९ च्या कायद्याच्या उल्लंघन झाल्याचे तर निष्पन्न होणारच आहे,तसेच ज्या डॉक्टरांनी यांना पाठीशी घालण्याच्या उद्देशाने मेडिकल सर्टिफिकेट दिले आहेत त्यांची नार्को टेस्ट करण्यात यावी या मागणीसाठी सोलापूर जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन येत्या आठ दिवसांमध्ये करणार आहे.

किरण साठे–सरचिटणीस सोलापूर जिल्हा-राष्ट्रवादी काँग्रेस

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom