पोषण आहाराची चौकशी करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे पंचायत समिती समोर २१ सप्टेंबरला बोंबाबोंब आंदोलन

पोषण आहाराची चौकशी करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे पंचायत समिती समोर २३ सप्टेंबरला बोंबाबोंब आंदोलन

प्रतिनिधी—माळशिरस—माळशिरस पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांना माळशिरस तालुक्यातील अंगणवाडी मध्ये पोषण आहारामध्ये दिल्या जाणाऱ्या पदार्थाची चौकशी करण्यात यावी या मागणीचे निवेदन देऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी बोंबाबोंब आंदोलनाचा इशारा दिला आहे.

माळशिरस तालुक्यातील अंगणवाडी मध्ये शालेय व अंगणवाडी मध्ये पोषण आहारामध्ये दिल्या जाणाऱ्या पदार्थांची क्वालिटी अतिशय निकृष्ट दर्जाची असून त्यामध्ये दिले जाणारे अनेक पदार्थ हे अंगणवाडी मध्ये शिकणाऱ्या मुलांचे पालक हे टाकून देताना दिसत आहेत मात्र त्या निकृष्ट दर्जाच्या पदार्थाकडे आपल्या पंचायत समितीच्या अधिकारी यांचे दुर्लक्ष असून त्यामध्ये दिले जाणारे मीठ आहे,त्यामध्ये मोठे खडे दिसून येत आहेत,तसेच तेलाचा वास येण्याचा प्रकार होत असल्याने तेलही वारपरण्या लायक नसून तसेच इतर डाळी दिल्या जातात त्याचे वजन ही पकेजवर लिहिलेल्या वजनाएवढे दिसून येत नाही तरी या सर्व बाबी मी आपल्या संबंधित अधिकारी यांना दाखविल्या आहेत असे निवेदनात म्हटले आहे.

शालेय व पोषण आहारामध्ये दिल्या जाणाऱ्या सर्व पदार्थ व डाळीच्या वजनाची चौकशी करून संबंधित ठेकेदार या शालेय पोषण आहाराचे पदार्थ निकृष्ट दर्जाचे देत असून त्याचीही चौकशी करून संबंधित ठेकेदार यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे,आणि संबंधित मागणीची दखल न घेतल्यास २३ सप्टेंबर रोजी माळशिरस पंचायत समितीच्या समोर बोंबाबोंब आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी दिला आहे.

चौकट

माळशिरस तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व अंगीकृत संघटनेच्या व जनरल बॉडीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी या आंदोलनाला उपस्थित राहावे असे आव्हान करण्यात येत आहे

किरण साठे

सरचिटणीस–सोलापूर जिल्हा-राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom