माळशिरस पंचायत समिती समोर राष्ट्रवादी काँग्रेसचे बोंबाबोंब आंदोलन
प्रतिनिधी–माळशिरस–गटविकास अधिकारी माळशिरस यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सोलापूर जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी निवेदन देऊन माळशिरस तालुक्यातील अंगणवाडी मध्ये शालेय पोषण आहारामध्ये दिल्या जाणाऱ्या पदार्थाची चौकशी करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले.यावेळी अपंग जनता दलाचे विजय कुलकर्णी,उमाजी मिसाळ,बापू वाघमारे,दत्तात्रय सावंत,रुक्मिणी रणदिवे,धनाजी पाटील,अभय भोसले,धवल कांबळे,सागर कोळी,उदय कांबळे,रणजित भोसले,सैलानी शेख,बंडू कांबळे,दत्तू भोसले,आदित्य काकडे,मामा मोहिते,बाळू मिसाळ इत्यादी उपस्थित होते.
माळशिरस तालुक्यातील अंगणवाडी मध्ये शालेय पोषण आहारामध्ये दिल्या जाणाऱ्या पदार्थांची क्वालिटी अतिशय निकृष्ट दर्जाची असून त्यामध्ये दिले जाणारे अनेक पदार्थ हे अंगणवाडी मध्ये शिकणाऱ्या मुलांचे पालक हे टाकून देताना दिसत आहेत मात्र त्या निकृष्ट दर्जाच्या पदार्थाकडे आपल्या पंचायत समितीच्या अधिकारी यांचे दुर्लक्ष असून त्यामध्ये दिले जाणारे मीठ आहे,त्यामध्ये मोठे खडे दिसून येत आहेत,तसेच तेलाचा वास येण्याचा प्रकार होत असल्याने तेलही वारपरण्या लायक नसून तसेच इतर डाळी दिल्या जातात त्याचे वजन ही पकेजवर लिहिलेल्या वजनाएवढे दिसून येत नाही तरी या सर्व बाबी मी आपल्या संबंधित अधिकारी यांना दाखविल्या दाखविल्याचे.तसेच गेल्या सहा महिन्यातील पोषण आहाराचे रजिस्टर तापसण्याची व बेकायदेशीर अंगणवाडी आय एस ओ केलेल्या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी सांगितले.
सदर आंदोलनादरम्यान पंचायत समिती चा परिसर घोषणांनी दणाणून गेला होता,सहाय्यक प्रशासन अधिकारी श्री कदम,कनिष्ठ सहाय्यक प्रशासन अधिकारी श्री बुगड व व्ही एम लोंढे एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प माळशिरस यांनी संबंधित आंदोलनाची दखल घेऊन लेखी पत्र देऊन पोषण आहार प्रकरणाची चौकशी करून २५/९/२०२० पर्यंत अहवाल मिळाल्यानंतर पुरवठा दारावर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांना दिले आहे.
