
नातेपुते,माळशिरस,वेळापूर,अकलूज पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अवैध दारू,ताडी,शिंदी विक्री कायमची बंद करण्याची मागणी
दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरूच….
प्रतिनिधी : नातेपुते,माळशिरस,वेळापूर,अकलूज पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अवैध दारू,ताडी,शिंदी विक्री कायमची बंद करण्यात यावी आणि विक्री व निर्मिती करणाऱ्यावर तडीपारीची कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने अकलूज मधील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासमोर दिनांक ९जून रोजी विराट असा मोर्चा काढण्यात आला मात्र वरील नमूद गावातील अवैधरित्या विक्री केली जाणारी दारू,शिंदि,ताडी बंद करण्यात आली नाही तसेच असे बेकायदेशीर धंदे चालवण्यावरती कठोर कारवाई करण्यात आली नाही,त्यामुळे महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने अकलूज मधील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारक समोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू असून प्रशासन जोपर्यंत हे बेकायदेशीर आणि अवैधरीत्या चालू असलेले धंदे बंद करत नाही तोपर्यंत महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे आंदोलन चालूच राहील असे पक्षाचे वतीने सांगण्यात आले.