सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
प्रतिनिधी—जांबुड ते बोरगाव रस्त्याच्या कामाची चौकशी करून दोषी आढळणाऱ्या ठेकेदार व कामात कसूर केलेल्या अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी सार्वजनिक बांधकाम विभाग अकलूज यांच्या कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस व बहुजन ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष किरण साठे यांनी ठिय्या आंदोलन केले आहे.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस व बहुजन ब्रिगेडचे अध्यक्ष किरण साठे,बहुजन ब्रिगेडचे नेते शंकर वाघमारे,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेश खरे,सदस्य ऋषीपाल बनसोडे,जिल्हा सचिव माऊली धाइंजे,लोकसभा अध्यक्ष सोमनाथ शेळके,तालुका अध्यक्ष धनाजी पाटील,महिला आघाडी तालुका अध्यक्ष रुक्मिणी रणदिवे,तालुका सचिव शिवम कांबळे,सरचिटणीस अभयराजे भोसले,उदय कांबळे,उपाध्यक्ष बंडू कांबळे,विकास केसकर,सिद्धार्थ वाघमारे,रफिक मुलाणी,अभिजित रणदिवे,गेना पवार,उपस्थित होते.सदर निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाचे श्री माळवे साहेब यांनी स्वीकारले.
जांबुड-बोरगाव-खंडाळी-निमगाव-मळोली रस्ता,प्रजिमा क्र१७९ कि.मी०/००ते ६/०० हे काम अर्थसंकल्प २०१९-२०२० अंतर्गत मंजूर असून हे काम शिवरत्न कन्ट्रक्शन अकलूज यांना मिळाले आहे,तरी हे काम प्रमाणकानुसार होत नाही म्हणून त्याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस व बहुजन ब्रिगेडचे अध्यक्ष किरण साठे यांनी केली आहे.तसेच हे काम निकृष्ट दर्जाचे होत असताना संबंधित जबाबदार असलेले अधिकारी या ठेकेदाराला पाठिशी घालत असल्याचा आरोप किरण साठे यांनी केला आहे,तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग अकलूज येथे कार्यरत असलेले कार्यकारीअभियंता,उपअभियंताव संबंधित काम ज्यांच्या कार्यक्षेत्रात येत आहे त्या शाखा अभियंता यांच्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी पुणे येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता यांच्या कार्यालयासमोर २५ फेब्रुवारी रोजी तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती किरण साठे यांनी दिली.
