
अतुल खूपसे या इसमाने अवैधरित्या जमीन बळकावल्याप्रकरणी माहिती सेवा भावी संस्था यांच्या वतीने 1 जुलै रोजी पासुन बेमुदत आमरण उपोषण सुरू
अतुल खूपसे यांनी डांगे यांच्या कुटुंबातील सदस्यांना विश्वासात घेऊन दि.2008 रोजी माढा सत्र समित समोर भाडेतत्वावर करार करून पंधरा एकर जमिनीचे करार करून घेतले होते करारामध्ये दरवर्षी 6000/- प्रमाणे रक्कम डांगे परिवाराला अतुल खुपसे यांनी देण्याचे ठरवले होते परंतु अतुल खुपसे यांनी 2008 ते 2020 पर्यंत काही रक्कम डांगे यांच्या कुटुंबाला दिलेली नाही व सदर कराराच्या रकमेवर विषयी बोलले असता असे या गुन्हेगारने गावगुंडांना हाताशी धरून डांगे कुटुंबीयांना बऱ्याचदा मारहाण केली परंतु पोलिसांनी डांगे कुटुंबावर खोटे गुन्हे दाखल केले आहेत कायदा हा संपूर्णपणे आर्थिक पाठबळ याच्या आधारावर चाललेला आहे असे प्रथमदर्शनी दिसते म्हणून आरोपी खूपसे यांच्यावर कारवाई करून लँड माफिया कायदेशीर प्रक्रियेचा विचार करून गुन्हा दाखल करावा व पीडितांना न्याय मिळवून द्यावा ज्या मागणीसाठी माहिती सेवा भावी संस्था संस्थापक अध्यक्ष व त्रिदल सैनिक सेवा संघ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष संदीप (भाऊ) लगड मेजर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व माहिती सेवाभावी संस्था पश्चिम महाराष्ट्र संघटक महेंद्र भाऊ साठे व माहिती सेवाभावी संस्था सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष सचिन रणदिवे यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात आले. उपोषण कर्ते रतन डांगे, मोहन यादव, रामचंद्र गोसावी,आशाबाई यादव, सुशालाबाई गोसावी, हे माढा तहसील कार्यालय समोर उपोषणासाठी बसले आहेत.
यावेळी छावा क्रांतिवीर सेना जयश्रीताई रायजादे जिल्हाध्यक्ष महिला आघाडी यांनी उपोषणास जाहीर पाठिंबा दिला यावेळी माजी सैनिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष मेजर नारायण अंकुशे साहेब,त्रिदल सैनिक सेवा संघ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष व माहिती सेवा भावी संस्था संस्थापक अध्यक्ष मेजर संदिप(भाऊ) लगड,माजी जि प सदस्य बाळासाहेब सपताळे, इंदापूर तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी इंदापूर तालुका प्रमुख नितीनजी शिंदे साहेब, हिंदुस्थान माथाडी कामगार सेनेचे सरचिटणीस दूर्वा शेवाळे, इंदापूर शिवसेना शहर प्रमुख महादेव सोमवंशी,इंदापूर शाखा प्रमुख रविराज पवार, तालुका अध्यक्ष शिवसेना शाखाप्रमुख मेजर मंगेश जाधव, मेजर नवनाथ सोनवणे व सर्व आजी माजी सैनिक यांनी उपोषणास भेटी देऊन जोपर्यंत पिडीत कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत सर्व आजी माजी सैनिक सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहतील असे असे बोलताना मेजर संदीप(भाऊ) लगड यांनी सांगितले.