अजित साठे,रोहित वाघमारे,विजय बनकर यांचा महाराष्ट्र विकास सेना पक्षात प्रवेश

अजित साठे,रोहित वाघमारे, विजय बनकर यांचा महाराष्ट्र विकास सेना पक्षात प्रवेश

वेळापूर जिल्हा परिषद गटामध्ये निवडणुकीची रणनीती आखण्यास मविसे पक्षाने सुरवात केल्याची चर्चा ?

प्रतिनिधी : वेळापूर: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या अनुषंगाने पिलीव जिल्हा परिषद गटामध्ये असलेल्या मौजे मळोली तालुका माळशिरस येथे महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या शाखेच्या माध्यमातून पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक पक्षप्रमुख किरण साठे यांच्या प्रमुख उपस्थितीत व तालुका अध्यक्ष धनाजी जाधव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.यावेळी प्रदेश सचिव अनिल साठे,संपर्क प्रमुख बाळासाहेब कांबळे, युवा सेना जिल्हा संघटक साईराज अडगळे, माळशिरस तालुका सरचिटणीस सतीश साठे,यांच्यासह जिल्हा परिषद गटामध्ये असलेल्या शाखेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी वेळापूर येथील श्री.अजित साठे, श्री.रोहित वाघमारे,श्री.विजय बनकर,यांनी महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पक्षप्रमुख किरण साठे यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्ष प्रवेश केला. त्यांचा सत्कार किरण साठे यांनी पक्षाचे उपरणे आणि हार घालून केला.वेळापूर मधील कार्यकर्त्यांनी प्राथमिक प्रवेश केला आहे, लवकरच ते मोठा कार्यक्रम आयोजित करणार असल्याची माहिती मिळाली आहे,हा पक्षप्रवेश झाल्याने वेळापूर जिल्हा परिषद गटामध्ये निवडणुकीची रणनीती आखण्यास महाराष्ट्र विकास सेना पक्षाने सुरवात केली असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom