बोरगाव जिल्हा परिषद गटामध्ये निवडणूक लढविण्याचे मविसे पक्षाने फुंकले रणशिंग !

माळखांबी येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा !.महिला सेनेच्या शाखेचेही अनावरण

प्रतिनिधी:बोरगाव जिल्हा परिषद गटामध्ये अनुसूचित जातीसाठी आरक्षण राखीव झाले असून या निवडणुकीच्या अनुषंगाने महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने माळ खांबी येथे जिल्हा परिषद गटातील प्रमुख गावातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मंगळवारी मेळावा पक्षप्रमुख किरण साठे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित केला होता.मेळाव्याला महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे प्रदेश सचिव अनिल साठे संपर्क प्रमुख बाळासाहेब कांबळे,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेश खरे,पश्चिम महाराष्ट्र प्रसिद्धीप्रमुख धनाजी साठे, माळशिरस तालुका अध्यक्ष,धनाजी जाधव पाटील,तालुका सरचिटणीस सतीश साठे,माढा विधानसभा अध्यक्ष बिभीषण साठे,महिला सेनेच्या तालुका अध्यक्षा सौ.शोभा लवटे,माळखांबी शाखेतील शहराध्यक्ष सागर सरतापे,उपाध्यक्ष महादेव साठे,कुमार साठे,यांच्यासह बोरगाव जिल्हा परिषद गटामध्ये असलेल्या सर्व गावातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी माळखांबी गावामध्ये महिला सेनेच्या शाखेचे अनावरण पक्षप्रमुख किरण साठे यांच्या हस्ते करण्यात आले. मेळाव्याला महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. बोरगाव जिल्हा परिषद गटामध्ये निवडणूक लढविणार असल्याची माहिती पक्षप्रमुख किरण साठे यांनी दिली.

माळशिरस तालुक्यातील सत्ताधारी आणि विरोधक यांना मागे टाकत महाराष्ट्र विकास सेना पक्षाने निवडणुकीच्या अनुषंगाने माळशिरस तालुक्यामध्ये एक पाऊल पुढे टाकले आहे.त्यामुळे महाराष्ट्र विकास सेना पक्ष माळशिरस तालुक्यातील सर्वसामान्य जनतेमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे,स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने महाराष्ट्र विकास सेना पक्षाने माळशिरस तालुक्यातील प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये पक्षाच्या माध्यमातून कार्यकर्ते व पदाधिकारी यांचा मेळावा आयोजित करण्याचा कार्यक्रम हातामध्ये घेतला आहे.त्यामुळे सत्ताधारी व विरोधकांची अडचण झाल्याचे पाहायला मिळत आहे.बोरगाव जिल्हा परिषद गटामध्ये महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या माध्यमातून माळशिरस तालुका सरचिटणीस सतीश साठे माढा विधानसभा अध्यक्ष बिबीशन साठे माळखांबी शहराध्यक्ष सागर सरतापे हे संभाव्य उमेदवार आहेत,त्याच पद्धतीने बोरगाव पंचायत समिती गण व जांभूड पंचायत समिती गणामध्ये दोन उमेदवार उभा करण्यात येणार असल्याचे जाहीर करून निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom