
अकलूज नगरपरिषद निवडणुक : प्रभाग क्रमांक ७ मध्ये आदित्य काकडे प्रभावी उमेदवार!
जनतेचा काकडे यांना उभा राहण्यासाठी दबाव व प्रोत्साहन
जनतेच्या आग्रहाखातर निवडणुकीत उतरणार – आदित्य काकडे
काकडे प्रतिनिधी : महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या माध्यमातून गेले दोन वर्ष प्रभाग क्रमांक ७ मध्ये महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे युवा सेना तालुकाध्यक्ष आदित्य काकडे यांनी अनेक कामे केलेली आहेत,त्या प्रभागांमध्ये सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणीमध्ये उभा राहून त्यांना आधार देण्याचे काम आदित्य काकडे यांनी आतापर्यंत केले आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक ७ मध्ये महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या माध्यमातून ते संभाव्य उमेदवार म्हणून त्यांची घोषणा करण्यात आली आहे,त्या प्रभागामध्ये त्यांनी संपूर्ण जनतेशी नाळ जोडलेली असून जनतेच्या मनामध्ये आदित्य काकडे यांनी घर निर्माण केले आहे.प्रत्येकाला आपलासा वाटणारा प्रत्येकाला हवाहवासा वाटणारा माणूस म्हणून त्यांनी त्या प्रभागांमध्ये त्याची ओळख निर्माण केलेली आहे,येणाऱ्या अकलूज नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आदित्य काकडे यांचा प्रभाग क्रमांक ७ मध्ये पारडं जड असून त्यांना प्रभागातील जनतेमधून निवडणुकीला उभे राहण्यासाठी दबाव टाकला जात आहे व प्रोत्साहन दिले जात आहे. जनतेच्या आग्रहाखातर आदित्य काकडे यांनी निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी निर्णय घेतलेला आहे. त्यांच्या पाठीशी महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पक्षप्रमुख किरण साठे यांचे पाठबळ असून ते प्रभाग क्रमांक ७ मध्ये प्रभावी उमेदवार असून ते निवडणुकीत विजयाच्या दिशेने कूच करतील अशा पद्धतीची चर्चा प्रभाग क्रमांक ७ मध्ये सुरू आहे. जनतेच्या आग्रहाखातर कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढविण्यासाठी सज्ज असल्याचे आदित्य काकडे यांनी स्पष्ट केले आहे.